Gautam Adani at Mahakumbh : अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी मंगळवारी (21 जानेवारी) महाकुंभात उपस्थित होते . त्यांनी त्रिवेणी संगमावर पूजा-अर्चना केली. त्यानंतर बडे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. महाकुंभात मला अद्भूत अनुभव आला. येथील व्यवस्थांसाठी मी देशवासीयांच्या वतीनं पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो, अशी भावना त्यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली. येथील व्यवस्था हा मॅनेजमेंट संस्थेसाठी संशोधनाचा विषय आहे. माझ्यासाठी गंगा मातेच्या आशिर्वादाहून मोठं काही नाही, असं त्यांनी सांगितलं.
गौतम अदाणी यावेळी म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये खूप साऱ्या संधी आहेत. राज्याच्या विकासात अदाणी समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. अदाणी यांनी यावेळी इस्कॉन मंडपात आयोजित भंडारा सेवेमध्येही सहभागी झाले.
महाकुंभातील सेक्टर 18 मध्ये असेल्या इस्कॉन व्हीआयपी शिबिरात गौतम अदाणी यांनी महाप्रसाद बनवला. त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रीती अदाणी देखील उपस्थित होत्या.
अदाणी ग्रुपची 'महाप्रसाद सेवा'
अदाणी समूह यावर्षी इस्कॉन आणि गीत प्रेसच्या मदतीनं महाकुंभात येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यात येत आहे. इस्कॉनच्या मदतीनं अदाणी समूह रोज एक लाख भाविकांच्या महाप्रसादाचं वितरण करत आहे. परिसरात 'अदाणी महाप्रसादा'चे आयोजन केले जात आहे. तिथंही हजारो भक्तांची गर्दी होत आहे.
महाकुंभमध्ये आलेल्या उत्तर प्रदेशच्या अंकित मोदनवाल यांनी सांगितलं, 'गौतम अदाणींकडून महाप्रसादाची खूप चांगली व्यवस्था आहे. सर्व भक्तांसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. खाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे. गौतम अदाणींप्रमाणेच अन्य उद्योगतींनीही पुढं येऊन सनातन धर्माबद्दल जागृत होण्याची आवश्यकता आहे.'
जमशेदपूरच्या एका भाविकानं सांगितलं की, 'इस्कॉन आणि अदाणी समुहाकडून खूप चांगल्या पद्धतीनं भंडाऱ्याचं व्यवस्थापन करण्यात आले आहे. येथील खाण्याची गुणवत्ता खूप चांगली आहे. इथं भाविकांची मदत केली जात आहे. गौतम अदाणींप्रमाणेच अन्य उद्योगपतींनीही श्रद्धेच्या या महापर्वात पुढं आलं पाहिजे.'
(IANS इनपुटच्या मदतीनं)