Shocking जिम ट्रेनरने 80,000 उकळले, इंजेक्शनमुळे रक्तपुरवठा थांबला अन् हाड सडलं; नितंबावर झाला हा गंभीर परिणाम

Avascular Necrosis Gym Case: जिम ट्रेनरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शन आणि स्टेरॉइड्समुळे एका तरुणाला 'एव्हीएन' हा गंभीर आजार झाला असून त्याचे हाड सडले आहे. फिटनेसच्या नावाखाली 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Avascular Necrosis Gym Case: जिम ट्रेनरच्या चुकीमुळे तरुणीचे नितंब डेड झाले"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • गाझियाबाद येथील एका जिममध्ये स्टेरॉइड्स दिल्याने तरुणाला Avascular Necrosis नावाचा गंभीर आजार झाला
  • पीडित कमल कांत त्यागी याने जिम संचालकावर ८० हजार रुपयांची वसुली करून चुकीचे उपचार देण्याचा आरोप केला आहे
  • वैद्यकीय अहवालानुसार, पीडिताच्या उजव्या नितंबाचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे हाड आतून सडून चपटे झाले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Avascular Necrosis Gym Case: जर तुम्हालाही जिमची आवड असेल आणि कमी वेळात बॉडी बनवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही बातमी तुम्हाला सतर्क करणारी आहे. वर्कआऊट दरम्यान घेतली जाणारी सप्लिमेंट्स स्टेरॉइड्स तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. असाच एक भीतीदायक प्रकार गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरातून समोर आला आहे, जिथे फिटनेस ट्रेनिंगच्या नावाखाली एका तरुणाला धोकादायक इंजेक्शन आणि स्टेरॉइड्स देण्यात आले, ज्यामुळे त्याचे शरीर पूर्णपणे खराब झाले आहे. पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यासोबत वैद्यकीय तपासणी अहवालही जोडला आहे. दरम्यान जिम चालकाची बाजू समोर आलेली नाही.

फिटनेसच्या नावाखाली 80 हजारांची वसुली आणि चुकीचे उपचार

पीडित कमल कांत त्यागी उर्फ विक्की त्यागी याने इंदिरापुरम येथील 'एएसआर फिटनेस' जिमचे संचालक गुलजार खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कमल कांत यांचे म्हणणे आहे की, ते या जिममध्ये व्यायामासाठी जात असत. यादरम्यान जिम चालकाने त्यांना उत्तम फिटनेस आणि शानदार बॉडी बनवण्याचे आमिष दाखवले. कमल कांत यांच्याकडून सुमारे 80 हजार रुपये उकळण्यात आले, ज्यामध्ये काही रक्कम UPIद्वारे आणि उर्वरित रोकड स्वरूपात घेण्यात आली. या बदल्यात त्यांना अनट्रेंड पद्धतीने अनेक औषधे आणि स्टेरॉइड्सची इंजक्शन्स देण्यात आली.

Advertisement

Ghaziabad Gym Trainer Case: पीड़ित शख्स की मेडिकल रिपोर्ट और इंदिरापुरम पुलिस को दी गई शिकायत की कॉपी

मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा: नितंबावर झाला परिणाम 

चुकीच्या पद्धतीने दिलेल्या या इंजक्शन्सचा परिणाम पीडिताच्या शरीरावर इतका वाईट झाला की, त्यांच्या पार्श्वभागावर गंभीर परिणाम झाला आहे. पीडिताच्या वैद्यकीय अहवालानुसार (MRI Pelvis), त्यांना 'Avascular Necrosis' (AVN) नावाचा गंभीर आजार झाला आहे. हा आजार Ficat Stage IV म्हणजेच चौथ्या टप्प्यावर पोहोचला आहे, ज्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या उजव्या नितंबाच्या हाडाचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे ते आतून सडून चपटे झाले आहे, अशी धक्कादायक माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.  इंजक्शनचा धोकादायक दुष्परिणाम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

(नक्की वाचा: Mango Fine: खबरदार! झाडावरुन पडलेले फळ उचलाल तर 3.75 लाखाचा दंड, 'ही' चूक करु नका)

पोलिसांनी एफआयआर नोंदवला, तपास सुरू

शरीरावर झालेल्या या धोकादायक दुष्परिणामांनंतर पीडित कमल कांत त्यागी यांनी इंदिरापुरम पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. जिम चालकाने जाणूनबुजून आपल्याला चुकीची औषधे दिली, ज्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप त्यागी यांनी केला आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अनधिकृत जिम ट्रेनर्सवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पीडिताने केली आहे.