गोवा: गोव्यामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. गोव्यातील शिरगाव येथे जत्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर १० जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. श्री लैराय जत्रेदरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर गोव्यात एका यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. शनिवारी (ता. 3 मे) रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेत जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही सक्रिय झाले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
या चेंगराचेंगरीमागील कारण सध्या तपासले जात आहे. सुरुवातीच्या पोलिस तपासात चेंगराचेंगरीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.या कार्यक्रमासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात व्यवस्था केल्याचे सांगण्यात येत आहे. यात्रेदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष पोलिस पथकही तैनात करण्यात आले होते. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोनचा वापरही केला जात होता.
( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )
दरम्यान, या जत्रेनिमित्त शिरगावमध्ये विशेष तयारी केली जाते. हा प्रसंग खास बनवण्यासाठी संपूर्ण शिरगाव सजवण्यात आले आहे. या प्रसंगी भाविक प्रार्थनेसाठी देवीच्या लैराई मंदिरात जातात. असे मानले जाते की देवीला मोगरा फुलांची माळ खूप आवडते, म्हणूनच या मंदिरात मोगरा फुलांपासून बनवलेल्या माळा खास अर्पण केल्या जातात. या जत्रेत अनेक भाविक उपवास करतात.