बाईईई..हा काय प्रकार! दसऱ्याला सोनं खरेदीत 25 टक्क्यांनी झाली घट, मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं

Today Gold Rate News :   गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोनं इतकं महागलं आहे की, सामान्य माणसाला सोनं खरेदी करताना घाम फुटत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Gold Rate Today
मुंबई:

Today Gold Rate News :   गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या किंमतीत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोनं इतकं महागलं आहे की, सामान्य माणसाला सोनं खरेदी करताना घाम फुटत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, यंदाच्या दसऱ्याला सोन्याची विक्री घटली आहे. यामध्ये 25 टक्के घट होऊन ते 18 टन इतकं झालं आहे.

गुरुवारी साजरा करण्यात आलेल्या दसरा सणानिमित्त सोन्याची रिटेल प्राईज 1.16 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. जी 2024 च्या दसऱ्याच्या 78000 रुपये प्रति 10 ग्रॅम किंमतीपेक्षा 48 टक्के जास्त आहे. ग्राहकांना सराफा बाजाराच्या किंमतीशिवाय 3 टक्के जीएसटी (GST) सुद्धा द्यावं लागेल. ज्वेलरीच्या डिझाईनच्या आधारावर ज्वेलर्सवर 15 ते 30 टक्के मेकिंग चार्जही लागू शकतं. दरम्यान, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 119400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 109450 रुपये झाली आहे.

IBJA च्या नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी म्हटलंय की, गतवर्षी दसरा सण तेजीत होता. कारण सोन्याची विक्री 24 टन इतकी झाली होती. यावर्षी दसऱ्याला सोन्याच्या किंमती 1.16 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या आहेत. यामुळे मागणी कमी झाली आहे. दरम्यान, ग्राहकांनी सोनं खरेदी करणं सुरु केलं आहे.कारण  त्यांना वाटतंय की, सोन्याच्या किंमतीत लगेच घट होणार नाही. आगामी सण धनतेरस, दिवाळी आणि लग्नासाठी सोन्याच्या ऑर्डर दिल्या जात आहेत. 

नक्की वाचा >> कप सिरपमुळे 11 लहान मुलांचा मृत्यू! पोलिसांनी डॉक्टरला केली अटक, धक्कादायक माहिती समोर

सामान्य लोकांना सोनं खरेदी करणं कठीण

मागील एक वर्षात सोनं 80 हजारांहून 1 लाखांच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे सोनं सामान्य लोकांच्या बजेटबाहेर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लोक सोनं आता ज्वेलरीसाठी कमी, तर गुंतवणुकीसाठी जास्त खरेदी करत आहेत. भविष्यासाठी सोन्याची खरेदी केली जात आहे. ज्या लोकांना ज्वेलरी बनवायची आहे, ते जुन्या सोन्याची खरेदी करत आहेत. इकोनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार,काही ज्वेलर्सचं म्हणणं आहे की, लोक नवीन ज्वेलरी खरेदी करण्याऐवजी जुन्या ज्वेलरीची अदला-बदली करत आहेत. जुन्या सोन्याची खरेदी-विक्री देशभरात वाढली आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयने केलं मोठं कांड! बिल्डिंगमध्ये पार्सल देताना तरुणीच्या छातीला हात लावला अन्..CCTV Video व्हायरल