
Delivery Boy Touched A Girl Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं संतापाची लाट पसरली आहे. ब्लिकिंटच्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची घटना उघडकीस आली आहे. या डिलिव्हरी बॉयने तरुणीला पार्सल देताना तिच्या छातीला स्पर्श केल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत केलेल्या अश्लील वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
@eternalxflames या एक्स यूजरने हा व्हिडीओ शेअर करून कंपनीकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, डिलिव्हरी बॉय तरुणीच्या घराबाहेर उभा असतो.तो त्याच्या बॅगमधून पार्सल बाहेर काढतो. त्यानंतर तरुणी त्याला पैसे देते. त्यानंतर तरुणीला पार्सल देतो आणि तिला चुकीच्या पद्धतीने छातीला स्पर्श करतो. त्यानंतर तरुणीला मोठा धक्का बसतो आणि ती मागे सरकते.
ब्लिकिंटकडे कारवाईची मागणी
@eternalxflames या यूजरने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय,ब्लिकिंटकडून आज ऑर्डर स्वीकारताना माझ्यासोबत हे घडलं. डिलिव्हरी बॉयने मला माझा पत्ता दोनदा विचारला आणि त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही खूप धक्कादायक घटना आहे. ब्लिकिंटने यावर कठोर कारवाई करावी. भारतात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का? असा सवालही या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. तसच दुसऱ्या एका पोस्टमध्ये यूजरने म्हटलंय, त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी पार्सलने माझी चेस्ट लपवण्याचा प्रयत्न केला,जेणेकरून त्याने पुन्हा असं करू नये. कृपया, यावर कठोर कारवाई करावी.
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit ...is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO
— S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
ब्लिकिंटने दिलं उत्तर
तरुणीच्या माहितीनुसार,ब्लिकिंटने या प्रकरणी कारवाई करत डिलिव्हरी बॉयचं कॉन्ट्रॅक्ट संपवलं आहे आणि त्याला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलं, त्याने जाणून बुजून असं केलं आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. कॅमेरा चालू होता, ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर हे सिद्ध करणं कठीण झालं असतं. दुसऱ्या यूजरने म्हटलं, मला वाटतं की हे चुकून झालं असावं. त्याला वाटलं असेल की पार्सल उजव्या हातात आहे.
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit ...is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO
— S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world