उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये घडलेल्या हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. प्रेमप्रकरणावरुन पत्नीनेच पतीचे तुकडे करुन ड्रममध्ये ठेवल्याचे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. अशातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोरुन आले असून पत्नीने पतीला मारुन ड्रममध्ये भरीन अशी धमकी दिली तसेच बेदम मारहाण केल्याचा आरोपही केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे नेमके प्रकरण?
धर्मेंद्र कुशवाह हे झाशीचे रहिवासी आहेत. 2016 मध्ये त्याने बस्ती येथील रहिवासी माया मौर्यसोबत प्रेमविवाह केला. तसेच त्यांच्या पत्नीच्या सोयीसाठी त्याने तिच्याच नावावर तीन गाड्याही खरेदी केल्या आणि गोंडामध्ये घर बांधत होता. पण लग्नाच्या काही काळानंतर त्याची पत्नी दररोज मारहाण करू लागली. धर्मेंद्र यांनी यापूर्वीही त्यांच्या पत्नीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
यूपी : गोंडा जिले में जल निगम के जूनियर इंजीनियर धर्मेंद्र कुशवाह को पत्नी ने वाइपर से पीटा। धर्मेंद्र का आरोप है कि पत्नी ने पास में रखे नीले ड्रम और सीमेंट की बोरियां दिखाते हुए अपने बॉयफ्रेंड संग मिलकर मेरठ वाले सौरभ जैसा हाल करने की धमकी दी है। pic.twitter.com/BkK6ragFZ6
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 30, 2025
धर्मेंद्र यांचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे कंत्राटदार नीरज मौर्यसोबत अवैध संबंध होते. तो बऱ्याच वेळा त्याच्या पत्नीवर संशय घेत असे. त्यानंतर तो त्याच्या पत्नीवर लक्ष ठेवू लागला. 7 जुलै 2024 रोजी धर्मेंद्र त्यांच्या पत्नी मायासोबत झोपले होते आणि नीरज मौर्य शेजारच्या खोलीत झोपले होते. रात्री धर्मेंद्र जागे झाले तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या नातेवाईक नीरज मौर्य यांच्यासोबत शेजारच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा प्रथम दोघांनी त्याला मारहाण केली आणि नंतर रात्री माया नीरज मौर्यसोबत कुठेतरी निघून गेली. 25 ऑगस्ट 2024 रोजी ती पुन्हा नीरजसोबत घरी परतली आणि जबरदस्तीने कुलूप तोडून घराचा ताबा घेतला.
Farmer Loan : शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिरनाम्यातच? राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण...
धक्कादायक बाब म्हणजे, धर्मेंद्र यांनी मायाने त्यांना चाकूने मारण्याचा आणि वाइपरने मारहाण करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी न्यायाची मागणी केली आहे आणि म्हटले आहे की माया त्यांचे तुकडे करून ड्रममध्ये गाडण्याची धमकी देत आहे. हा खटला कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहे, परंतु एसपींच्या आदेशानुसार महिला पोलिस ठाण्यात तपास सुरू आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज रावत म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.