गुगलने भारतात 9 भाषांमध्ये AI असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप केले लाँच

AI Assistant Gemini: गुगलने मंगळवारी (18 जून) भारतामध्ये एआय असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप लाँच केले.

Advertisement
Read Time: 2 mins

गुगलने (Google) मंगळवारी (18 जून) भारतामध्ये एआय असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप लाँच केले. हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ, तेलुगू, उर्दू अशा एकूण नऊ भाषांमध्ये जेमिनी अ‍ॅप आता उपलब्ध आहे. युजर्संना टाइप करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार फोटो जोडण्यासाठी ॲप परवानगी देते.  

Google कंपनीचे सीईओ सुंदर पिचई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत म्हटले की, आम्ही जेमिनी अ‍ॅडव्हान्स्डमध्ये या स्थानिक भाषांसह अन्य सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देत आहोत आणि गुगल मेसेजमध्ये जेमिनी AI असिस्टंट इंग्रजी भाषेमध्ये लाँच करत आहोत".

(ट्रेडिंग न्यूज: रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम)

जेमिनी एक्सपीरियंसचे इंजिनिअरिंग उपाध्यक्ष अमर सुब्रमण्यम यांच्या ब्लॉगमधील माहितीनुसार, "आयफोन युजर्ससाठी गुगल अ‍ॅपच्या माध्यमातून जेमिनी येत्या काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होईल.  

याव्यतिरिक्त आम्ही जेमिनी अ‍ॅडव्हान्स्डमध्ये डेटा विश्लेषण क्षमता, फाइल अपलोड करणे आणि गुगल मेसेजमध्ये जेमिनीसह चॅट करण्यासाठीचे फीचरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, हे फीचर इंग्रजी भाषेमध्ये असेल; अशा पद्धतीचे नवनवीन फीचर उपलब्ध करून देत आहोत".  iOSवर पुढील काही आठवड्यांमध्ये गुगल ॲपमध्ये थेट जेमिनी एआय असिस्टंटचा वापर करणे शक्य होईल.   

Advertisement

सुब्रमण्यम पुढे असेही म्हणाले की, "गुगल एआय असिस्टंच जेमिनीला भारतातील पहिल्या वर्षामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांपासून ते डेव्हलपर्संपर्यंत आणि अन्य लोकांनीही दैनंदिन जीवन अधिक सुखकर तसेच क्रीएटिव्हिटी वाढवण्यासाठी जेमिनीचा वापर करत आहेत".  

Advertisement

(ट्रेडिंग न्यूज: अदाणी एअरपोर्टसची दणदणीत कामगिरी, रचला नवा विक्रम)

याव्यतिरिक्त, भारतातील जेमिनी अ‍ॅडव्हान्स्ड अ‍ॅपचे युजर्स आता प्रगत AI मॉडेल Gemini 1.5 Pro फीचर्सचा वापर करू शकतील.

(ट्रेडिंग न्यूज: रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Topics mentioned in this article