जाहिरात

अदाणी एअरपोर्टसची दणदणीत कामगिरी, रचला नवा विक्रम

अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024मध्ये एकूण 10 लाख 13 हजार 115 मेट्रीक टन कार्गोची यशस्वीरित्या हाताळणी केली. भारताच्या हवाई मालवाहतूक क्षेत्राचे एकूण आकारमान लक्षात घेता हा हिस्सा एकूण बाजाराच्या 30.1 टक्के इतका आहे.

अदाणी एअरपोर्टसची दणदणीत कामगिरी, रचला नवा विक्रम

अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) ने आर्थिक वर्ष 2024 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आर्थिक वर्षात अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने 10 लाख टनांपेक्षा अधिक हवाई मालाची हाताळणी केली आहे.  गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2023 मध्ये  9 लाख 44 हजार 912 मेट्रीक टन हवाई मालाची हाताळणी केली होती.  

आर्थिक वर्ष 2023 शी तुलना केल्यास आर्थिक वर्ष 2024मध्ये हवाई मालाच्या यशस्वी हाताळणीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने सुदृढ व्यवस्थापन क्षमतेचे दर्शन घडवले असून हवाई माल वाहतूक क्षेत्रातील ही धोरणात्मक वाढ हा आजवरच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024मध्ये एकूण 10 लाख 13 हजार 115 मेट्रीक टन कार्गोची यशस्वीरित्या हाताळणी केली. भारताच्या हवाई मालवाहतूक क्षेत्राचे एकूण आकारमान लक्षात घेता हा हिस्सा एकूण बाजाराच्या 30.1 टक्के इतका आहे. आर्थिक वर्ष 2024मध्ये अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय हवाई मालाची हाताळणी केली. एकूण हाताळणी केलेल्या मालापैकी 65 टक्के माल हा आंतरराष्ट्रीय होता. अदाणी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने देशांतर्गत माल वाहतूक क्षेत्रातले आपले वर्चस्व कायम राखतानाच जगभरात मालाच्या हाताळणीतील स्वत:ची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

(नक्की वाचा- अदाणी पोर्ट्सद्वारे संचालित मुंद्रा बंदराचा विक्रम, भारतात आलेल्या सर्वाधिक क्षमतेच्या जहाजाने टाकला नांगर)

गेल्या आर्थिक वर्षात मालवाहतूक  6 लाख 6 हजार 348 मेट्रीक टन इतकी होती. या आर्थिक वर्षात ती 9 टक्क्यांनी वाढली असून या आर्थिक वर्षात ती 6,62,258 मेट्रीक टन इतकी होती. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या हाताळणीमध्ये ऑटोमोबाईल, औषधोत्पादने, नाशवंत वस्तू, इलेक्ट्रीकल्स, अभियांत्रिकी उत्पादने, अवजारे आणि अन्य सामान यांचा समावेश होतो.

हवाई वाहतुकीद्वारे विविध प्रकारच्या वस्तू अमेरिका, ब्रिटन, जर्मनी , नेदरलँड, युएईला पाठवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई), सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद), चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ), तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) आणि जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या हवाई मालाची हाताळणी करण्यात आली होती. 

AAHL मध्ये, आम्ही व्यवस्थापकीय सज्जतेच्या आणि  कार्यक्षमतेचे नवे टप्पे पार करत असून. या आर्थिक वर्षात कार्गो टर्मिनल्सनी 10 लाख टनांहून अधिक मालाची हाताळणी करून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई वाहतूक दोन्ही ऑपरेशन्स क्षेत्रातील, सेवा प्रदान करणारी  कंपनी म्हणून आमची स्थिती मजबूत झाली आहे. 

नक्की वाचा - Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ'

2 पुरस्कारांनी AAHL चा गौरव

AAHL ने 2023-2024 या आर्थिक वर्षात यशाची नवी शिखरे पादाक्रांत केली.  आर्थिक वर्ष 2024 मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विक्रमी मालाची हाताळणी करण्यात आली. AAHL उत्तम कामगिरीसाठी 2 मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. कार्गो एयरपोर्ट ऑफ द ईयर- रिजन इंडिया या पुरस्काराने एअर कार्गो इंडिया 2024त सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कार्गो विमानतळ-कार्यक्षमता आणि डिजिटलीकरणासाठी 'इंडिया कार्गो पुरस्कार 2023'ने सन्मानित करण्यात आले.

या व्यतिरिक्त AAHL च्या दिमाखदार कामगिरी करत आपल्या कामगिरीचा स्तर आणखी उंचावण्याचे काम केले. मुंबईतील SACT ट्रेड पार्टनर्सच्या वतीने 100% व्हर्च्युअल खाते लागू केले, जे देशांतर्गत कार्गो ऑपरेशन्समध्ये डिजिटलायझेशनच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) ने 18 मे 2024 रोजी इंडिगोचे पहिले A320neo मालवाहू विमान हाताळले. मार्च 2024 मध्ये चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (लखनौ)  700 टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करण्यात आली. AAHL ने चॅलेंज ग्रुप, CMA CGM Air Cargo, Air Pace, Kenya Airways, IndiGo आणि Uganda Airlines सारख्या नवीन मालवाहतूक ऑपरेटर्सना आपल्या जाळ्यामध्ये समाविष्ट करण्यात यश आले.

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: