UPS : 1 एप्रिलपासून लागू होणार नवी पेन्शन योजना! वाचा सरकारी कर्मचाऱ्यांचा काय होणार फायदा?

Unified Pension Scheme Explained:  केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees)  युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) लागू करणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Unified Pension Scheme Explained:  केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees)  युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) लागू करणार आहे. ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System-NPS) नुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. किमान 10 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

UPS नुसार निवृत्तीच्या 12 महिने आधी सरासरी बेसिक सॅलरीच्या 50 टक्के रक्कम पेन्शनच्या रुपात मिळणार आहे. या योजनेच्या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

युनिफाईड पेन्शन योजनेची (UPS) वैशिष्ट्ये

  1. ही योजना केंद्र सरकारच्या सध्याच्या आणि नव्या कर्मचाऱ्यांसाठी NPS नुसार ऑप्शनल असेल.
  2. कर्माचाऱ्यांना बेसिक सॅलरी आणि DA च्या 10 टक्के रक्कम दर महिना द्यावी लागेल.
  3. सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना निवडण्यासाठी ते जॉईन झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.
  4. जे कर्मचारी 12 महिन्यांपेक्षा जास्त काम करत आहेत, त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी या योजनेचा अर्ज भरता येईल.

( नक्की वाचा : Unified Pension Scheme (UPS): प्रत्येक सरकारी कर्माचाऱ्याला माहिती हव्यात या 10 गोष्टी )
 

कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

  • 10 वर्ष नोकरी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळण्याची खात्री असेल.
  • 25 वर्ष सेवा करुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.
  • कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना अंतिम पेन्शनच्या 60 टक्के हिस्सा कौटुंबीक पेन्शनच्या रुपानं देण्यात येईल.

रिटायरमेंट फंड आणि पेन्शन कशी मिळणार?

UPS नुसार निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कम मिळणार आहे. ती त्यांची शेवटची बेसिक सॅलरी आणि DA च्या 10 टक्के असेल. एखाद्या कर्मचाऱ्यांना 25 वर्ष नोकरी केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती (VRS)  घेतली तर त्याला त्याची सामान्य निवृत्ती जेव्हा होईल तेव्हाच पेन्शन मिळेल. 

एखादा कर्मचाऱ्यानं 55 व्या वर्षी VRS घेतली आणि त्याच्या निवृत्तीचे वय 60 असेल तर त्याला 60 वर्षांचा झाल्यानंतरच पेन्शन मिळेल. ही योजना महाभाई भत्त्याच्या (DA) आधारावर असेल. त्यामुळे पेन्शनर्सना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

Advertisement

युनिफाईड पेन्शन योजना ही विशेषत: कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी बनवण्यात आली आहे. त्यामध्ये खात्रीशीर पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि किमान पेन्शन या फायद्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक बळकटी मिळणार आहे.