Vadodara Gambhira Bridge Collapse: गुजरातमध्ये मोठी पूल दुर्घटना; अनेक वाहने नदीत कोसळली

गुजरात के आणंद जिले में बड़ा हादसा हो गया है. जहां पुल टूटसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक नदीत पडलेल्या वाहनांमधील प्रवाशांना वाचवताना दिसत आहेत. तर पडलेल्या पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत बुडण्यापासून थोडक्यात बचावला.ने की वजह से कई वाहन नदी में जा गिरे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vadodara Gambhira Bridge Collapse:  गुजरातमधील आणंद जिल्ह्यात पूल कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडल्याची घटना घडली आहे. कोसळलेला पूल महिसागर नदीवर आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आणि पाच जणांना वाचवण्यात आले. पूल कोसळताच ट्रक आणि इतर वाहने नदीत पडली.  हा पूल बराच काळ जीर्ण अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे.

पुलाचा 'स्लॅब' कोसळल्यानंतर 5 ते 6 वाहने महिसागर नदीत पडल्याचे गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले. महिसागर नदीवरील गंभीरा पूल मध्य गुजरात आणि राज्याच्या सौराष्ट्र प्रदेशाला जोडतो. पटेल यांनी माध्यमांना सांगितले की, हा पूल 1985 मध्ये बांधण्यात आला होता आणि वेळोवेळी आणि गरज पडल्यास त्याची देखभाल केली जात होती. मंत्री म्हणाले, 'घटनेचे खरे कारण तपासले जाईल.' मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तज्ञांना घटनास्थळी पोहोचून अपघाताचे कारण शोधण्याचे निर्देश दिले आहेत.

या अपघाताबाबत आणंदचे जिल्हाधिकारी प्रवीण चौधरी म्हणाले, एक ट्रक, एक इको आणि काही बाईक खाली पडल्या आहेत. वडोदरा प्रशासन आणि एनडीआरएफ घटनास्थळी उपस्थित आहेत. पुलावर अडकलेल्या टँकरला कोसळण्यापासून वाचवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. वडोदरा टीम, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ सर्वजण बचाव कार्यात गुंतले आहेत."

जवळजवळ 900 मीटर लांबीचा हा पूल 23 खांबांवर आहे. वडोदरा आणि गुजरातमधील आणंद जिल्ह्यांना जोडतो. त्याचे उद्घाटन 1985 मध्ये झाले होते.
पूल दुर्घटनेचे हे भयानक दृश्य पाहून अनेकांचा श्वास रोखला गेला. गुजरातमधील या पूल दुर्घटनेने मोरबी पूल दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. मोरबी पूल दुर्घटनेत 100  हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Advertisement