आधी छातीवर लाथा मारल्या अन्...10 रुपयांसाठी हत्या; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

केवळ १० रुपयांसाठी एका ४१ वर्षीय दिव्यांग व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI image

Gujarat News : गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील भदरवा गावातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ १० रुपयांसाठी एका ४१ वर्षीय दिव्यांग व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

राजेशभाई धनजीभाई तडवी असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग होती. त्यांना अर्धांगवायूचा त्रास होता. शुक्रवारी सकाळी ते गावातील बस स्थानकावरून किराणा सामान घेऊन घरी परतत होते. वाटेत ३३ वर्षांचे धर्मेंद्रभाई तडवी याने त्यांना अडवले. आणि स्वत:च्या खर्चासाठी १० रुपयांची मागणी केली. जेव्हा राजेशभाईंनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपी धर्मेंद्रने त्यांना जोरात धक्का दिला. यानंतर ते रस्त्यावर पडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्या छातीवर लाथा मारल्या आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यावर पाय देऊन जीव घेतला. यानंतर राजेशभाईंचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

नक्की वाचा - Thane News : 21 व्या मजल्याच्या बाल्कनीत 5 दिवस आगंतुक 'पाहुणा'; कुंड्यांमध्ये हालचाल दिसताच रहिवासी हादरले!


गावाच्या सरपंचांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक ए.पी. सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी धर्मेंद्र तडवी विरुद्ध 'भारतीय न्याय संहिता' (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका साध्या कारणावरून अशा प्रकारे एका असहाय्य व्यक्तीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.