गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्रासाठी मात्र नकार

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीची धामधुम सर्वत्र सुरू आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गुजरातच्या कांद्याला परदेशात निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. तशी आधिसूचनाच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढली आहे. विशेष म्हणजे एकीकडे गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देताना महाराष्ट्रातल्या कांद्यावर निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुजरातमधून तब्बल दोन हजार मॅट्रिक टन पांढऱ्या कांदा या निर्णयामुळे निर्यात करता येणार आहे. यावरून आता राजकीय वातावरणही तापले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा  


केंद्र सरकारने दिली परवानगी 

लोकसभा निवडणुकी पूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. ही निर्यात बंदी उठली पाहीजे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. या निर्यात बंदीचा सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसला होता. त्यात आता गुजरातच्या कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना तब्बल दोन हजार मेट्रीक टन कांदा निर्यात करता येणार आहे. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्काच आहे. दरम्यान जे परिपत्रक काढण्यात आले आहे त्यानुसार हा कांदा गुजरातच्या मुद्रा पोर्टवरून निर्यात करता येणार आहे. शिवाय तो निर्यातदारांच्या माध्यमातून पाठवला जाईल. याबाबतही संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा -  तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?

सरकारवर हल्लाबोल 

गुजरातच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक न्याय केंद्र सरकार देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रा बरोबर हे सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गुन्हा काय असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. गुजरात राज्यातील शेतकरी तुपाशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी मात्र उपाशी, हा अन्याय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असल्याचे ही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. 

हा दुजाभाव का? : 

या प्रकरणी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार गुजरातमधील शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी असा दुजाभाव करत आहेत. असा दुजाभाव का केला जातोय असा सवालही त्यांनी केला आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय का असेही शेतकरी विचारणा करत आहेत. ही कुठे तरी थांबले पाहीजे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे अशी भावनाही व्यक्त केली जाते. 

Advertisement

'महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पाप काय?' 

कांदा निर्यातीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टिका केली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केले त्यामुळे तुम्ही असा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला मारायचे आहे का? मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहात असा खडा सवाल त्यांनी यानिमित्ताने केला आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची अधिक शक्यता आहे. कांदा पट्ट्यात अजून मतदान होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा विरोधक तापवणार हे नक्की आहे.  

Advertisement