जाहिरात

Gujrat Fire: फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट! 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना

Gujrat Banaskantha fireworks factory explosion:सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली.

Gujrat Fire: फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट! 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना

गुजरात: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा शहरात मंगळवारी (1 एप्रिल) एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला. कारखान्यामध्ये 30 कामगार करत होते, ज्यामधील अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच अडकलेल्या कामगारांचीही सुटका केली जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत डीसा ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील  धुनवा रोडवर असलेल्या या फटाक्यांच्या कारखान्याचे काही भाग कोसळले आणि त्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे आग लागली, ज्यामुळे अनेक कामगार अडकले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली.

आग इतकी भीषण होती की गोदामाचा ढिगारा 200 मीटर अंतरापर्यंत उडून गेला. मृत कामगारांचे मृतदेह दूरवर विखुरलेले होते. आगीच्या घटनेनंतर जेसीबीच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते कारण अपघाताच्या वेळी 20 हून अधिक लोक उपस्थित असल्याचा संशय आहे. आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, ४ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या स्फोटामध्ये  गोदामात फक्त साठवणुकीची परवानगी होती, तर गोदामाच्या नावावर फटाक्यांचा कारखाना सुरू होता. बॉयलरमुळे गोदामात मोठी आग लागल्याचा दावा केला जात आहे. गोदामात स्फोट झाल्यानंतर मालक पळून गेला असून डीसा जीआयडीसी आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे,  मंगळवारी राजधानी दिल्लीतील झंडेवालन एक्सटेंशनमधील एका इमारतीत भीषण आग लागली. अनारकली बिल्डिंग आणि डीडीए शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. काही मिनिटांतच आगीने भयानक रूप धारण केले, ज्यामुळे इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात आली.

(नक्की वाचा - Gold Price : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर; एक तोळ्याची किंमत 91 हजारांवर)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: