Haryana Exit Poll Result : हरयाणामध्ये काँग्रेसचं पुनरागमन, एक्झिट पोलमध्ये बंपर बहुमत

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

हरयाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांवर आज (शनिवार, 5 ऑक्टोबर) रोजी मतदान झालं. विधानसभेत स्पष्ट बहुमतााठी 46 जागा जिंकण्याची गरज आहे. मतदानानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत. सत्तारुढ भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होत आहे. या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हरयाणामध्ये कुणाचं सरकार येणार? याबाबतचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

Haryana Exit Polls

ध्रुव रिसर्च पोलच्या एक्झिट पोलनुसार हरयाणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार आहे. 

एक्झिट पोल - ध्रुव रिसर्च पोल
भाजपा - 22 ते 32
काँग्रेस+ -  50 ते 64
जेजेपी+ -   0

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

एक्झिट पोल - दैनिक भास्कर
भाजपा - 15 ते 29
काँग्रेस+ - 44 ते 54
जेजेपी+ - 0 ते 1

( नक्की वाचा : 'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप )
 

पिपल्स पल्स एक्झिट पोलनंही भाजपाची निराशा केली आहे. या पोलनुसारही हरियाणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार आहे.

एक्झिट पोल - पिपल्स पल्स
भाजपा - 20 ते 32
काँग्रेस+ - 49 ते 61
जेजेपी+ - 0 ते 1

रिपब्लिक भारत - मॅट्रिझच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

एक्झिट पोल  - रिपब्लिक भारत - मॅट्रिझ
भाजपा - 18 ते 24
काँग्रेस+ - 55 ते 62
जेजेपी+ - 0 ते 3

हरयाणा विधानसभा निवडणुकासाठी करण्यात आलेल्या सर्व एक्झिट पोलच्या सरासरीच्या अधारावर तयार करण्यात आलेल्या NDTV Poll of Polls मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत देण्यात आलं आहे. 

एक्झिच पोल - NDTV Polls of Poll

भाजपा - 24
काँग्रेस+ - 55 
जेजेपी+ - 1
 

हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. या एक्झिट पोलपैकी कोणता अधिक अचूक ठरतो, हे त्या दिवशी स्पष्ट होईल.