महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील बहिणींच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होत आहेत. महाविकास आघाडीला हे पाहावत नाही. महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील. बहिणींच्या हातामधील पैसा दलालांच्या हातामध्ये जाईल, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधानांच्या हस्ते आज (शनिवार 5 ऑक्टोबर) ठाण्यात मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यासह वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'अर्बन नक्षल काँग्रेस चालवत आहेत'
पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसला जोरदार लक्ष्य केलं. आज अर्बन नक्षल काँग्रेस चालवत आहेत. काँग्रेस उघडपणे त्यांच्यासोबत उभी आहे. सरकार बनवण्याचं स्वप्न पाहात आहे. काँग्रेसला त्यांची व्होटबँक एक राहील पण, बाकीचे लोकं सहज वेगळे होतील असं वाटत आहे. समाजाची विभागणी करा, लोकांची विभागणी करा हाच काँग्रेसचा हेतू आहे. आम्हाला भूतकाळापासून बोध घ्यावा लागेल. 'हम बटेंगे तो बाटनेवाले मैफील सजायेंगे' हे लक्षात ठेवा काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
'मविआमुळे मेट्रो 3 रखडली'
आज महायुती सरकारचं लक्ष्य महाराष्ट्र विकास हे ध्येय आहे. दुसरिकडं महाविकास आघाडी सरकार विकास ठप्प करणे हे काम आहे. मविआला विकास कामाला लटकाना, अटकाना आणि भटकाना या तीन गोष्टी येतात. मुंबई मेट्रो 3 हे याचं उदाहरण आहे.
मेट्रो 3 ची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये सुरु झाली. 60 टक्के काम पूर्ण झालं. अडीच वर्षात काम थांबल्यानं प्रोजेक्टची किंमत 14 हजार कोटींनी वाढली. हा पैसा महाराष्ट्राच्या करदात्यांच्या कष्टाचा पैसा होता. एकीकडं काम पूर्ण करणारी महायुती सरकार दुसरिकडं विकासाला ठप्प करणे महाविकास आघाडीचे लोकं आहे. ते महाविकास विरोधी लोकं आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यांनी बुलटे ट्रेनलाही विरोध केला. ते तुमचं प्रत्येक काम थांबवत होते, तुम्हाला आता त्यांना थांबायचं आहे.विकासच्या शत्रूंना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे, असं मोदींनी यावेळी बजावलं.
( नक्की वाचा : 'आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणना...' कोल्हापूरच्या सभेत राहुल गांधींच्या 2 मोठ्या घोषणा )
काँग्रेस लूट आणि फसवणूकीचं पॅकेज
कोणताही काळ, कोणतेही राज्य असो काँग्रेसचं चरित्र बदलत नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला. फक्त गेल्या एका आठवड्यातील घटनांची उदाहरणं त्यांनी यावेळी दिली. गेल्या आठवडाभरात काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचं जमीन घोटाळ्यात नाव आलंय, हरियणात काँग्रेस नेते ड्रग्जमध्ये सापडले. एक नेत्यांना महिलांना शिवीगाळ केली. काँग्रेसकडून निवडणुकीत मोठी देते पण सत्तेत आल्यावर शोषणाचे मार्ग शोधते.
हिमाचल प्रदेशमध्ये तर काँग्रेसनं तर हद्द केलीय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. त्यांनी टॉयलेट टॅक्स सुरु केला. मोदी एकीकडं सांगतंय टॉयलेट बनवा त्याचवेळी काँग्रेस 'टॉयलेट टॅक्स' लावत आहे. काँग्रेस लूट आणि फसवणुकीचं पूर्ण पॅकेज आहे. लूट झूट आणि कुशासनचं पॅकेज काँग्रेसची ओळख आहे. ही फक्त गेल्या काही दिवसांमधील उदाहरणं आहेत. काँग्रेस वर्षानुवर्ष हेच करत आहे. महाराष्ट्रात त्यांनी रंग दाखवण्यास सुरु केली आहे, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world