Robert Vadra : रॉबर्ट वाड्राला ईडीकडून समन्स; काय आहे जमीन व्यवहारासंबंधित वाद?

हरियाणा जमीन घोटाळा प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Robert Vadra ED inquiry : हरियाणा जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने दुसऱ्यांदा रॉबर्ट वाड्राला समन्स पाठवित चौकशीसाठी बोलावलं आहे. गेल्या वेळी 8 एप्रिलला त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र ते ईडीच्या कार्यालयात गेले नव्हते. आज सकाळी 11 वाजता ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले.

जमीन व्यवहाराच्या वादातील हे प्रकरण 2018 सालचं आहे. सुरेंद्र शर्माच्या तक्रारीनंतर 1 सप्टेंबर 2018 रोजी गुडगावच्या खेरकी दौला पोलीस ठाण्यात या प्रकरणासंबंधित तक्रार दाखल करण्यात आली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रॉबर्ट वाड्रावर काय आहेत आरोप?


हरियाणा जमीन घोटाळा प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रॉबर्ट वाड्रा यांनी इतरांशी मिळून फसवणूक केल्याचा सुरेंद्र शर्मा यांचा आरोप आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणात आयपीसी कलम 420, 120, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आयपीसी कलम 423 अंतर्गत नवे आरोप जोडण्यात आले होते.   

Advertisement

नक्की वाचा - Crime News: एक नव्हे अनेक पुरुषांशी पत्नीचे प्रेमसंबंध, पतीला लागली खबर, पुढे भयंकर घडलं

जमीन व्यवहाराचा वाद...


तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी 2008 मध्ये गुडगावच्या शिकोहपूरमध्ये 3.5 एकर जमीन 7.5 कोटींमध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून खरेदी केली होती. कंपनीने कमर्शियल परवाना मिळविल्यानंतर ती संपत्ती रियल इस्टेट कंपनी डीएलएफला 58 कोटींमध्ये विकली होती. हरियाणाच्या तत्कालिन सरकारने त्याबदल्यात DLF ला गुडगावमधील वजीराबादमध्ये 350 एकर जमीन दिली होती. अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरात वाड्रा यांच्या कंपनीतील आर्थिक अनियमिततांची चौकशी करत आहे. म्हणूनच रॉबर्ट वाड्रा यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं.