भारतातील सर्वात महागडी मानली गेलेली व्हीआयपी VIP नंबर प्लेट 'HR88 B8888' साठी 1.17 कोटी रुपयांची बोली लागली. मात्र एवढी मोठी बोली लावून नंबर प्लेट खरेदी करणाऱ्या सुधीर कुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हरियाणा सरकारने आता त्यांची मालमत्ता आणि उत्पन्नाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
परिवहन मंत्र्यांचे आदेश
हरियाणाचे परिवहन मंत्री अनिल विज यांनी त्यांच्या विभागाला रोम्युलस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या वाहतूक सेवा कंपनीचे संचालक सुधीर कुमार यांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "आम्ही लिलावाद्वारे व्हीआयपी नंबर प्लेट्स ऑफर करतो. अनेक लोकांनी '8888' या नंबरसाठी बोली लावली. परंतु, सर्वाधिक बोली जिंकल्यानंतर बोलीदाराने रक्कम भरली नाही. त्यामुळे त्याने आपली 11,000 रुपयांची डिपॉझिट रक्कम देखील गमावली. परिवहन मंत्री विज यांनी कुमार यांच्याकडे 1.17 कोटी रुपयांची संपत्ती आहे की नाही, हे तपासण्यास सांगितले आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
उत्पन्न कर विभागाकडे चौकशीची मागणी
विज यांनी स्पष्ट केले की, ते लवकरच आयकर विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र लिहिणार आहेत. आर्थिक क्षमता नसताना बोलीदार नंबर प्लेटची किंमत वाढवणार नाहीत, याची काळजी घेणे हा यामागचा उद्देश आहे. लिलावात बोली लावणे हा छंद नाही, ती एक जबाबदारी आहे. ही नंबर प्लेट लवकरच पुन्हा लिलावासाठी उपलब्ध केली जाईल, असे अनिल विज म्हणाले.
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट
26 नोव्हेंबरला 'HR88B8888' या नंबर प्लेटने 1.17 कोटी रुपयांना विकली गेल्याने भारतातील सर्वात महागडी कार नोंदणी क्रमांकये जागा मिळवली होती. या नंबर प्लेटची ची मूळ किंमत 50,000 रुपये होती आणि यासाठी 45 अर्ज प्राप्त झाले होते.
(नक्की वाचा- Nagpur News: तुरुंगात आईची तडफड; बापाने सख्ख्या लेकींचे लचके तोडले; तृतीयपंथीयांकडून मुलींची सुटका)
बोलीची रक्कम भरण्याची अंतिम मुदत 1 डिसेंबर होती, परंतु सुधीर कुमार ती भरू शकले नाहीत. त्यांनी तांत्रिक बिघाड आणि कुटुंबाचा विरोध ही कारणे सांगितली होती. कुमार म्हणाले होते की, त्यांचा परिवार नंबर प्लेटवर एवढा मोठा खर्च करण्याच्या विरोधात आहे, तर त्यांचे स्वतःचे मत त्या बाजूने होते.
हरियाणा सरकार व्हीआयपी नंबर प्लेट्ससाठी दर आठवड्याला ऑनलाइन लिलाव आयोजित करते.