देशभरात सध्या उष्णतेने सर्वांनाच हैराण केले आहे. देशातल्या पाच राज्यात याचा परिणाम दिसून येत आहे. त्यात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. या राज्यातील 21 शहरात पारा जवळपास 40 पार गेला आहे. सर्वाधीक तापमानाची नोंद गुजरात आणि राजस्थान मध्ये नोंदवली गेली आहे. इथं पारा तब्बल 45.06 अंश सेल्सिअसवर गेला होता. गुजरातमधील कांडला आणि राजस्थान मधील बारमेर या शहरात 45.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील चार शहरात तापमान हे चाळीशी पार होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रातही सुर्याचा प्रकोप सुरू आहे. उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील जळगाव, अकोला, नागपूर शेनगाव आणि यवतमाळ या शहरात तापमान हे चाळीशी पार गेले होते. त्यात सर्वाधिक तापमान हे जळगाव शहरात नोंदवले गेले आहे. जळगावमध्ये 42.05 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अकोल्यात 43.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर तर नागपूर शेनगावमध्ये 42.02 तर यवतमाळमध्ये 42.04 अंश सेल्सिअस तापमान होते. येणाऱ्या काही काळात यात वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - Latur News: अडीच वर्ष गुंगारा दिला, पोलीस येताच गटारात लपला, पुढे जे झालं ते...
देशात सर्वाधिक उष्णतेच्या झळा या गुजरातमध्ये बसत आहेत. गुजरातमधील जवळपास 8 शहरांत चाळीशी पार पारा गेला होता. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंदही गुजरातच्या कांडला इथं झाली आहे. इथं पारा तब्बल 45.06 अंश सेल्सिअसवर गेला होता. या शिवाय सुंदरनगर, राजकोट, भूंज, दिसा, अहमदाबाद, अमरेली, गांधीनगर या शहरात तापमान हे चाळीशी पुढे होते. उष्णते मुळे या शहरातील नागरीकांची लाहीलाही झाली होती.
गुजरातनंतर राजस्थानमधील पाच शहरात तापमान हे चाळीशी पार होते. कांडला प्रमाणे राजस्थानच्या बारमेरमध्ये ही पारा 45.06 अंशावर गेला होता. या शिवाय जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, चुरू या शहरात ही पारा चाळीशी पार होता. जैसलमेरमध्ये तो 45 अंशावर होता. ओडिशातील बोयुध मध्ये 42 तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद, खजूराहो आणि रतलाम या शहरात पारा चाळीशी पार गेला होता. हवामान विभागाने हे आकडे प्रसिद्ध केले आहेत. येणाऱ्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता ही आहे.