- संपूर्ण देश सध्या भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे, तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे
- भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढण्याचा इशारा दिला आहे
- वर्ष 2024 मध्ये उन्हाच्या लाटेमुळे 1832 लोकांचा मृत्यू झाला, जो गेल्या दोन दशकेतील सर्वाधिक मृत्यूंपैकी एक आहे
Heatwave Alert In India: उत्तर आणि मध्य भारतासह संपूर्ण देश सध्या भीषण उष्णता तसेच उन्हाच्या तीव्र लाटेचा सामना करत आहे. नवतपाच्या काळात अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे तापमानाचा पारा इतका वाढला आहे की, लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. विदर्भ, मराठवाडासह मध्य आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मोठ्या भागात सध्या उन्हाच्या लाटेमुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. काही भागात तर तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) इशारा दिली आहे की, ही परिस्थिती पुढील काही दिवस अशीच राहू शकते, ज्यामुळे उष्माघातासह उष्णतेशी संबंधित अन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने हा इशारा दिलाय की उन्हाच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जारी केली आहे. 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो'च्या (NCRB) आकडेवारीनुसार, भारतात वर्ष 2024 मध्ये उन्हाच्या लाटेमुळे 1 हजार 832 लोकांचा मृत्यू झाला होता, जो गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक वार्षिक मृत्यूंपैकी एक आहे. हा आकडा वर्ष 2015 नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेव्हा अतिशय तीव्र स्वरुपातील उष्णतेमुळे 1 हजार 908 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
कोरोना महामारीच्या काळात उन्हामुळे कमी मृत्यू
कोरोना महामारीच्या काळात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट नोंदवली गेली होती. वर्ष 2021 मध्ये उन्हाच्या तीव्र झळांमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या घटून 374 वर आली होती. पण आता पुन्हा एकदा हा आकडा वाढत आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की दीर्घकाळ अति-तापमानाच्या संपर्कात राहणे किती घातक ठरू शकते.
(नक्की वाचा : भारतात Ebola Virusची एण्ट्री? युगांडाहून बंगळुरूत आलेल्या महिलेमध्ये आढळली ही लक्षणे; रक्ताचे नमुने पाठवले पुण्यात वर्ष 2024 च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, उन्हाच्या लाटेमुळे होणारे मृत्यू लिंग गुणोत्तरानुसार (महिला आणि पुरुषांमध्ये) समान नव्हते. मृतांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक होती. उन्हाच्या तीव्र लाटेचा सर्वाधिक फटका काम करणाऱ्या (नोकरी/व्यवसाय करणाऱ्या) वयोगटातील प्रौढांना बसल्याचे दिसून आले. उन्हाच्या तीव्रतेमुळे 30 ते 44 वर्षे वयोगटातील 525 पुरुषांचा मृत्यू झाला, तर 45-59 वर्षे वयोगटात हा आकडा याहूनही अधिक म्हणजेच 577 इतका होता. PTI फोटो. उन्हाच्या तीव्र लाटेमुळे समान वयाच्या महिलांचे मृत्यू पुरुषांच्या तुलनेत कमी झाले. याचे मुख्य कारण म्हणजे 30 ते 45 वर्षे वयोगटातील पुरुष बाहेरील कामांमध्ये किंवा शारीरिक स्वरुपात कठीण प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात गुंतलेले असतात. घराबाहेर जास्त वेळ राहिल्यामुळे त्यांना महिलांच्या तुलनेत उन्हाच्या लाटेच्या तडाखा अधिक बसतो. PTI फोटो. तरुणींच्या तुलनेत 18-29 वयोगटातील तरुणांचे जास्त मृत्यू 18-29 वर्षे वयोगटातील 152 पुरुषांचा तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला, तर याच वयोगटातील 23 महिलांना उन्हाच्या लाटेमुळे जीव गमवावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की, शारीरिक कष्ट आणि उन्हात जास्त वेळ घालवणे यामुळे उष्णतेचा फटका बसण्याचा धोका वाढतो. (नक्की वाचा : Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत 'या' एका भाजीपासून राहा लांब; नाहीतर आरोग्याबाबत पश्चाताप करावा लागेल!) उन्हाच्या तीव्रतेपासून कधी मिळणार दिलासा? भारतीय हवामान विभागाने 29 मे नंतर तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण यामुळे चिंतेची बाब पूर्णपणे कमी होत नाही. जसजशा उन्हाच्या लाटांच्या घटना अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत, तसतसे लोकांचे नुकसान जास्त होत आहे. विशेषतः जे लोक जास्त वेळ उन्हाच्या संपर्कात येतात, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आवाहन (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)उन्हाच्या लाटेचा कोणत्या वयोगटाला सर्वाधिक धोका?