उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. चमोली जिल्ह्यातील पाताळगंगा परिसरात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर डोंगराचा मोठा भाग खचला आहे. या घटनेचा धडकी भरवणार व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरड कोसळल्यानंतर जोसीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे.
व्हिडीओत दिसत आहेत की, डोंगराचा मोठा भाग खचला आहे. दरड कोसळल्यामुळे परिसरात सर्वत्र धुळच-धुळ दिसली. यामध्ये महामार्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासनाला याबाबत अंदाज आल्याने येथील महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उत्तराखंडमध्ये मान्सूनचा कहर पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून दरड कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. नद्यांना पूर आला आहे. या सर्व घटनांमुळे पर्यटनाला मोठा बसताना दिसत आहे. तसेत जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.