दिल्ली-NCR मध्ये तुफान पावसामुळे दाणादाण; शाळांना सुट्टी, हवाई वाहतुकीवरही परिणाम!

दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा पाण्याने भरलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

दिल्ली-NCR मध्ये 31 ऑगस्टपासून (Delhi Heavy Rain) अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रभर दिल्लीत तुफान पाऊस सुरू होता. आज सकाळी याचे परिणाम पाहायला मिळाले. नव्या संसद भवनाच्या आवारातही पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.   

हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यामुळे दिल्ली सरकारने आज सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राममध्ये अनेक जागांवर पाणी साचलं आहे. दिल्लीच्या अनेक मेट्रो स्टेशनबाहेर पाणी साचल्यामुळे लोकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. 

नक्की वाचा - पावसाने दिल्लीला झोडपले, नव्या संसद भवना बाहेरही पाणी भरले

ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 11 हून जास्त विमानं जयपूरकडे वळविण्यात आल्या आहेत. जोपर्यंत दिल्ली पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत शाळकरी मुलांनी बाहेर पडू नये, अशा सूचना सरकार तर्फे करण्यात आल्या आहेत.

Advertisement

मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू...
दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा पाण्याने भरलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला. याशिवाय दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघेजण जखमी जाले आहेत.