- हिमाचल प्रदेश के मंडी जिले में स्टाफ नर्स कमला देवी ने ड्यूटी पर पहुंचने के लिए उफनते नाले को पार किया.
- 20 अगस्त को बादल फटने से शिल्हबुधानी पंचायत के नाले में बाढ़ आई और सभी पैदल पुलियां बह गईं.
- नर्स कमला देवी ने जोखिम उठाकर कठोग पंचायत के हुरंग नारायण देवता के गांव में वैक्सीनेशन का कार्य पूरा किया.
हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात एक नर्स ड्यूटीवर पोहोचण्यासाठी घरातून निघाली, मात्र जात असताना वाटेत नदी-नाल्याचं रौद्र रुप होतं. थोडी चूक झाली असती तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली असती. मात्र धैर्य एकवटून नर्सने एका दगडावरुन दुसऱ्या दगडावर जोरदार उडी मारली. स्टाफ नर्स कमलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या धाडसाचं आणि कामाप्रती असलेल्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे.
हिमाचलमध्ये अद्यापही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. अशावेळी लोकांना कामावर जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंडी जिल्ह्यातील चौहार घाटीतील सुधार पंचायतच्या स्वाथ्य केंद्रात काम करणाऱ्या स्टार नर्स कमला देवी यांनी आपला जीव धोक्यात घाऊन मानवतेचं उत्तुंग असं उदाहरण समोर ठेवलं आहे.
नक्की वाचा - भटक्या कुत्र्यांची दहशत! पुण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणावर कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पाहा Video
मिळालेल्या माहितीनुसार, सुधार स्वास्थ केंद्रातील स्टाफ नर्स शुक्रवारी सकाळी कठोग पंचायतच्या हुरंग नारायण देवता गावात लसीकरणाची ड्यूटी करण्यासाठी जात होती. मात्र 20 ऑगस्ट रोजी मंडीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले होते. यादरम्यान नर्सला पूर आलेले नदी-नाले पार करायचे होते. नर्सने जीव धोक्यात टाकून नदी-नाला पार केला आणि लसीकरणासाठी गावात पोहोचली. त्यांचं कामाप्रती प्रेम पाहून अनेकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे.