Hindu Raksha Dal: याचा चेहरा लक्षात ठेवा! हा म्हणतोय 26 जुलैला जंतर-मंतरवर जावून आंदोलकांना फटकवणार

आता या सर्वांना ठोकून काढायचे. त्यांचे पार्श्वभाग लाल करायचे. त्यासाठी रविवारी 26 जुलैला दुपारी 12 वाजता आम्ही जंतर-मंतरवर पोहोचणार आहोत.

जाहिरात
Read Time: 3 mins

जंतर-मंतरवर सध्या CJP चे जोरदार आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. हे आंदोलन देशभरात गाजत आहे. शिवाय त्याला विद्यार्थ्यांचा देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा ही मिळत आहे. या आंदोलनात काही हिंसक घटना ही घडल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. तर काही ठिकाणी पोलिसांवर ही दगडफेक झाल्याचं सांगितलं गेलं. या हिंसाचारानंतर आता हिंदू रिक्षा दल समोर आलं आहे. 26 जुलैला जंतर-मंतरवर जावून आंदोलकांना फटकवणार अशी थेट धमकीच हिंदू रक्षा दलाचा नेता पिंकी चौधरी यांने दिली आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापण्याची दाट शक्यता आहे. धमकी देणारा त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिंदू रक्षा दल नावाची संघटना पिंकी चौधरी नावाचा व्यक्ती चालवतो. त्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट धमकी देत आहे. या व्हिडीओत तो म्हणतो, देशाचे वातावरण खराब करण्यासाठी काही लोक जंतर-मंतरवर जमा झाले आहेत. ते सर्व सनातनी विरोधी आहेत. त्यांना एक मुद्दा हवा होता. त्या द्वारे त्यांना भारतावर आघात करायचा होता. त्या नुसार ते देशाला जगात बदनाम करत आहेत. हा देश सनातनी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. या आंदोलनात असलेल्या मुली अश्लीलता पसरवत आहेत असं ही तो या व्हिडीओत म्हणतो.   

Advertisement

नक्की वाचा - CJP Protest: 2 तास बंद दारआड चर्चा, 3 मागण्या, 1 मागणीमुळे पेच? सरकारसोबत CJP ची चर्चा काय झाली?

आंदोलनात असलेल्या लोकांनी कोणत्या भाषेचा उपयोग केला आहे. ते भारतीय सैन्यासाठी वाईट बोलत आहेत. देशाचे तुकडे करणारे लोक तिथे आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस समाजवादी पार्टीसारखे पक्ष आहे. एक खासदार आहे. त्याचं नाव चंद्रशेख रावण आहे. तो स्वत:ला खूप मोठा समजत आहे. त्याची अक्कल आम्हाला ठिकाण्यावर लावायची आहे अशी धमकी ही त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हिंदू रक्षा दल हे काम करणार आहे. आम्ही देशाची प्रतिमा मलिन होवू देणार नाही. आमचा या आंदोलन करणाऱ्यांना विरोध आहे. हिंदू रक्षा दलाचे योद्धे आता शांत बसणार नाहीत. या लोकांनी हनुामा, राम, सिता यांच्याबाबत अपशब्द काढले आहेत.    

नक्की वाचा - Paper Leak Law: पेपर लीक प्रकरणी मोदी सरकारचा मोठा निर्णय, सोमवारी संसदेत बिल येणार, वाचा काय असेल तरतूद?

आता यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धर्मयोद्ध्यांना आवाहन आहे. आता या सर्वांना ठोकून काढायचे. त्यांचे पार्श्वभाग लाल करायचे. त्यासाठी रविवारी 26 जुलैला दुपारी 12 वाजता आम्ही जंतर-मंतरवर पोहोचणार आहोत. आम्ही भारतीय सैन्य आणि पोलिसांचे मनोबल खच्ची होवू देणार नाही. हिंदू रक्षा दल आता हे काम करणार. आम्ही पुर्ण ताकदीने जंतर-मंतरवर जाणार आहोत. 26 तारखेला तिथे पोहोचणार आहोत. तिथे असलेल्या आंदोलनकर्त्यांचे पार्श्वभाग लाल केल्या शिवाय आम्ही परत घरी येणार नाही अशी थेट धमकी त्यांनी या व्हिडीओतून दिली आहे. हा तथाकथीत हिंदूत्ववादी नेता पिंकी चौधरी नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. आता पुन्हा त्याने जंतर-मंतरवर हाणामारीची भाषा केली आहे. त्यामुळे रविवारी इथं काय होतं याबाबत टेन्शन नक्कीच वाढले आहे. दिल्ली पोलिस या धमकीकडे कशा पद्धतीने कारवाई करतात हे ही पाहावे लागणार आहे.
 

Advertisement