Home Locking System : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नुकतीच एक हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून टाकलं. एका घरात इलेक्ट्रिक कार चार्जिंग दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्यामुळे अनेक गॅस सिलिंडरं फुटले. आग इतक्या जलद गतीने पसरली की घरातील माणसं बाहेर पडूच शकली नाहीत. कारण? वीज गेल्यामुळे घरात लागलेली इलेक्ट्रॉनिक लॉक (डिजिटल लॉक) उघडू शकले नाहीत. यामुळे घरातील आठ जणांना तडफडून मृत्यू झाला.
या घटनेवरुन लक्षात येतं की, इलेक्ट्रॉनिक लॉक सुविधाजनक आहे, मात्र आपत्कालिन परिस्थितीत धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरात असे लॉक लावताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.
असे लॉक घ्यावेत जे वीज गेल्यानंतर आपोआप उघडू शकतील. अधिकांश चांगल्या इलेक्ट्रॉनिक लॉकमध्ये हा फिचर असतो. उदा. मॅग्नेटिक लॉक किंवा काही स्मार्ट लॉक वीज गेल्यानंतर अनलॉक होतात. फेल-सेक्योर (वीज गेल्यानंतर बंद होणार) लॉक घराच्या मुख्य दरवाज्यासाठी योग्य नाहीत.
मॅन्युअल ओव्हरराइड (Emergency Key) आवश्यक
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक लॉकसह एक फिजिकल किल्ली जी मॅन्युअल असेल अशी असावी. आग किंवा वीज गेल्यानंतर तुम्हीही किल्लीने दार उघडू शकाल. ही चावी कुठे आहे हे घरातील प्रत्येक सदस्याला माहिती असायला हवी. शिवाय सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी.
बॅकअप पॉवर सप्लाय लावा...
लॉक UPS किंवा बॅटरी बॅकअपशी जोडा. यामुळे वीज गेल्यानंतरही लॉक काही काळ सुरू राहील आणि उघडणं सोपं जाईल. अनेक लहान लॉकमध्येही बॅटरी बॅकअप आधीच असतो, मात्र तपासणं आवश्यक आहे.
फायर अलार्मशी कनेक्ट करा...
जर शक्य असेल तर लॉक घराच्या फायर अलार्म प्रणालीशी जोडा. आग लागताच अलार्म वाजतो आणि लॉक आपोआप अनलॉक होईल. हे फीचर मोठी घरं किंवा फ्लॅटमध्ये फायदेशीर ठरतं.
घरातील सर्व सदस्यांना आपत्कालिन परिस्थितीत काय करायला हवं याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक लॉक सुरक्षा वाढवतात आणि चोरी रोखतात, पण आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याची त्यांची क्षमता सर्वात महत्त्वाची आहे. इंदूरमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, योग्य निर्णय घ्या आणि सावधगिरी बाळगा. जर तुम्ही तुमच्या घरात असे कुलूप बसवत असाल, तर एका नामांकित आणि विश्वासार्ह कंपनीची निवड करा आणि कुलूप बसवताना सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी चौकशी करा.