- गुजरात के वलसाड जिले के पारडी इलाके में तेज रफ्तार कार ने राहगीर हितेश पटेल को जोरदार टक्कर मार दी
- हादसे का वीडियो पास के सीसीटीवी कैमरे में कैद हो गया जिसमें कार चालक की लापरवाही साफ दिखाई दे रही है
- पुलिस ने सीसीटीवी फुटेज के आधार पर मामला दर्ज कर फरार चालक की तलाश शुरू कर दी है
Gujarat Accident CCTV: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील पारडी परिसरातून 'हिट अँड रन'ची एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पादचारी अक्षरश: चेंडूसारखा हवेत उडाला. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला जखमी अवस्थेत मदत करण्याऐवजी चालक गाडीसह पसार झाला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
रेंटलाव गावात राहणारा हितेश पटेल हा तरुण केबल नेटवर्कचे काम करतो. तो आपली कार पार्क करून रस्ता ओलांडून ऑफिसच्या दिशेने जात होता. हितेश रस्ता ओलांडून जवळपास कडेला पोहोचलाच होता, तितक्यात समोरून आलेल्या एका अतिवेगवान कारने त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की हितेश आधी कारच्या बोनेटवर आदळला आणि नंतर फुटबॉलसारखा हवेत उडून अनेक फूट लांब रस्त्यावर जाऊन पडला. अपघात झाल्यानंतर चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही किंवा थांबून पाहण्याची तसदीही घेतली नाही. तो सुसाट वेगाने तिथून पळून गेला.
सीसीटीव्ही फुटेजने हादरले नागरिक
ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हितेशची काहीही चूक नव्हती. तो रस्त्याच्या कडेला असतानाही कारने त्याला जाणीवपूर्वक धडक दिल्याचे चित्र दिसते. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हितेशला रुग्णालयात दाखल केले.