'आकर्षणाचा नियम' (Law of Attraction) ही जगभर चर्चिली जाणारी संकल्पना आहे.एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर त्यासाठी खरंच काही नियम असतात का ? हे नियम पाळले तर खरंच आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या प्रेमात पडते का असा अनेकांना प्रश्न पडत असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपले विचार, भावना आणि दृढ विश्वास हा गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण सकारात्मक विचार ठेवून एखाद्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करतो तेव्हा आपले विचार एखाद्या चुंबकाप्रमाणे बनतात आणि ज्या गोष्टीसाठी आपण तन-मन हरपून विचार करत असतो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करतात असे बोलले जाते. ही गोष्ट आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीही उपयोगी पडू शकते.
नक्की वाचा: Simple Tricks to Spot a Liar: समोरचा खोटं बोलतोय कसे ओळखायचे? 5 गोष्टींमुळे एका सेकंदात कळेल
कोणासाठी लागू होतो लॉ ऑफ अट्रॅक्शन?
लॉ ऑफ अट्रॅक्शन ही प्रियकर, प्रेयसीपुरता ही बाब मर्यादीत नसून आपले वरिष्ठ, मित्र, नातेवाईक यांच्याबाबतही ही गोष्ट लागू होऊ शकते. उदा. तु्म्ही खूप चांगले काम करता मात्र त्यासाठी वरिष्ठ तुमचे कौतुक करत नाही, अशा वेळी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून वरिष्ठांनाही आकर्षित करू शकतो जेणेकरून ते आपल्या चांगल्या कामाचे कौतुक करतील. इतरांबाबतही हीच गोष्ट लागू होऊ शकते. समजा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते मात्र तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीलाही तुम्ही आवडावेत तर त्यासाठीही लॉ ऑफ अट्रॅक्शन (Law of Attraction) काम करू शकतो. पण हे नेमकं होतं कसं ? आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
स्वत:वर प्रेम करा
इतरांना आकर्षित करण्यापूर्वी त्यांना आपल्या प्रेमात पाडण्यापूर्वी महत्त्वाचे आहे ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वत:वर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करण्याची (Self-love) आणि स्वतःची किंमत ओळखण्याची (Self-worth)भावना आपल्यात विकसित करणे आवश्यक आहे.जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, तेव्हा तुम्ही इतरांनी तुमच्याशी कसे वागावे, याचा एक मापदंड तयार करता. यासाठी ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटेल, अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवणे गरजेचे आहे, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्यातल्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची स्वत:ला खात्री पटवून द्या. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागतो आणि हाच आत्मविश्वास इतरांना आकर्षित करण्यासाठी फार मोलाची भूमिका बजावतो. जेव्हा हा आत्मविश्वास जागृत होतो तेव्हा आपण कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार होतो, धाडसी, चटकन निर्णय घेणारी, निर्णय घेताच तत्काळ त्यावर काम करणारी आणि उत्तम निकाल देणारी आत्मविश्वासाने परीपूर्ण माणसे कोणाला आवडत नाही? त्यामुळे ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे.
नक्की वाचा: 12वीच्या विद्यार्थिनीने केले शिक्षकाशी लग्न; Video शेअर करत पोलिसांकडे केली मोठी मागणी
आदर्श नात्याची परिकल्पना मनात मांडा
मानव इतर सजीवांपेक्षा वेगळा आहे कारण तो विचार करतो आणि तो अंमलातही आणतो. तो मनात कल्पना मांडतो आणि त्यासाठी झटत असतो. ही कल्पनाशक्तीच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आपला आदर्श जोडीदार, साथीदार कसा असावा अशी आपण कल्पना मांडतो आणि त्यासोबतचे नाते कसे असावे याचीही कल्पना मनात तयार करतो. उदा. आनंदी, उत्कट प्रेमाची, जन्मोजन्मी साथीची अशी विविध कल्पना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल करत असतो. तुमच्या मनातील गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी या कल्पना एक मार्ग असतो.
आभार मानणे शिका
एखाद्या गोष्टीबद्दल आभार मानणे ही एक मोठी ताकद आहे. आज आपल्याला जे काही मिळाले आहे ते मिळाल्याबद्दल आपण आभारी असलो पाहीजे. आभार व्यक्त केल्याने जे प्रेम तुम्हाला लाभले आहे, मग ते तुमच्या साथीदाराकडून असेल, मित्र-मैत्रिणींकडून असेल अथवा कुटुंबीयांकडून असेल, तुम्ही या सृष्टीला एकप्रकारे संदेश देत असता की तुम्ही जे प्रेम लाभते आहे त्याहून कित्येकपट अधिक प्रेम स्वीकारण्यास तयार आहात. त्यामुळेच आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार गरजेचे असते.
नक्की वाचा: या चित्रात तुम्हाला कोणता प्राणी दिसला? उत्तरात दडलाय तुमचा स्वभाव
सकारात्मक गोष्टींचा विचार करा
आपल्या अंतर्मनाला विशिष्ट दिशा देण्याचे काम आपले विचार करत असता. विचार वाईट असले तर तो माणूस तसेच वर्तन करू लागतो, किंवा त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी जास्त होतात. त्याउलट एखादी व्यक्ती जेव्हा सकारात्मक विचार करते तेव्हा त्याचा अंतर्गमनावरही चांगला परिणाम होत असतो. प्रेमाबाबत बोलायचे झाल्यास एखाद्याने असा विचार केला की,"मला एका चांगल्या नात्यामध्ये असण्याचा अधिकार आहे" किंवा "मला एक प्रेमळ जोडीदार हवा असून आमचे नाते हे घट्ट असावे" हा सकारात्मक विचार तुमच्या मनात सातत्याने घोळत राहिला तर त्याचा तुमच्या प्रेमावर आणि नात्यावर चांगला परिणाम होतो.
चांगल्या विचारांना योग्य कृतीची जोड आवश्यक
लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये विचारांवर जरी जोर असला तरी प्रत्यक्ष कृती देखील गरजेची असते. अन्यथा मनातल्या गोष्टी बाहेर कधीच येणार नाही आणि मग सगळी गडबड होते. तुम्ही जो विचार करता तो प्रत्यक्षात यावा यासाठी त्या दिशेने कृती करणेही गरजेचे असते. आपल्याला आपल्या कल्पनेतील जोडीदार कुठे मिळू शकतो ते पाहून तिथपासून पुढील कृतीला सुरूवात करणे मदत करणारे ठरू शकते. म्हणजेच केवळ विचार करून थांबण्याऐवजी, त्या दिशेने योग्य दिशेने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)