Republic Day Parade Ticket: प्रजासत्तादिनाची परेड कर्तव्यपथावर बसून पाहता येईल; कसं मिळेल तिकीट?

Republic Day Parade : ऑनलाइन तिकीट खरेदीसाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमध्ये आमंत्रण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर तुम्हाला QR कोड वापरून बुकिंग कन्फर्म करावे लागेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

येत्या 26 जानेवारी रोजी देश 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. लाल किल्ल्यावर, कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहेत. कर्तव्यपथावर होणारी परेड नागरिकांसाठी प्रमुख आकर्षण असतं. ही परेड देशभक्ती, संस्कृती आणि एकतेच्या भावना निर्माण करते. भारताची ताकद देखील यावेळी दिसते. त्यामुळे प्रत्यक्ष लालकिल्ल्यासमोर बसून ही परेड पाहणे हा अविस्मरणीय क्षण असतो. संरक्षण मंत्रालयाने परेड पाहण्यासाठी तिकीट मिळवणे अधिक सोपं केलं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे तिकीट मिळवता येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऑफलाइन तिकीट कसं खरेदी कराल?

भारत पर्यटन विकास महामंडळ (ITDC) ट्रॅव्हल काउंटर, दिल्ली पर्यटन विकास महामंडळ (DTDC) काउंटर्स आणि दिल्लीतील विविध ठिकाणी विभागीय विक्री काउंटरसह विविध ठिकाणांहून कार्यक्रमासाठी तिकिटे मिळू शकतात. याव्यतिरिक्त, संसद भवन कार्यालय आणि जनपथवरील भारत सरकारचे पर्यटन कार्यालय देखील विशिष्ट वेळेत तिकीट खरेदीसाठी उपलब्ध आहे.

सेना भवन, शास्त्री भवन, जंतरमंतर, प्रगती मैदान आणि संसद भवन येथील बूथ आणि काउंटरवरूनही तिकीट ऑफलाइन खरेदी करता येतील. ऑफलाइन तिकीट खरेदी करताना तुम्हाला मूळ फोटो ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट तयार करावे लागेल.

(नक्की वाचा- प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी, पाहा खास फोटो)

ऑनलाइन तिकीट कसं खरेदी कराल?

ऑनलाइन तिकीट खरेदीसाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमध्ये आमंत्रण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर तुम्हाला QR कोड वापरून बुकिंग कन्फर्म करावे लागेल. याशिवाय, www.aaamantran.mod.gov.in वर भेट देऊन तुम्हाला ज्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे ते निवडावे लागेल. या अंतर्गत दोन श्रेणी असतील. पहिला प्रजासत्ताक दिन परेड असेल आणि दुसरा बीटिंग रिट्रीट सोहळा असेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि OTP कोड टाकून बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Advertisement

( नक्की वाचा : Dog Revenge : कुत्र्याचं 'बदलापूर', 'त्या' घटनेचा 12 तासांनी घेतला बदला, वाचा काय आहे प्रकार? )

तिकीटांची किंमत किती?

प्रजासत्ताक दिन परेड: 20 रुपये ते 100 रुपये
बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल: 20 रुपये
बीटिंग रिट्रीट सोहळा: 100 रुपये

Topics mentioned in this article