Aadhaar Update : 10 वर्ष जुनं आधार कार्ड मोफत करा अपडेट, वाचा सोपी पद्धत

तुम्ही डेडलाईनपूर्वी आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update Deadline) केलं नाही तर तुमची अनेक आवाश्यक कामं खोळंबून राहू शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
Free Aadhaar Update Last Date: आधार सेंटर वर आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.
मुंबई:

Aadhaar Update Details:  तुम्ही अजूनही 10 वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट  (Aadhaar Card Update Online) केलं नसेल तर लवकरात लवकर करा. UIDAI कडून आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सूविधा देण्यात आलीय. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही 14 जूनपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता.  तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर UIDAI ची वेबसाईट किंवा आधार सेंटरवर जाऊन कार्ड अपडेट करु शकता. UIDAI पोर्टलवर त्यासाठी कोणतेही शूल्क नाही. पण आधार सेंटरवर तुम्हाला 50 रुपये फी द्यावी लागेल. 

आधार अपडेट नसेल तर होईल खोळंबा
तुम्ही डेडलाईनपूर्वी आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update Deadline) केलं नाही तर तुमची अनेक आवाश्यक कामं खोळंबून राहू शकतात. घरबसल्या मोफत आधार कार्ड कसं अपडेट करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सोप्या पद्धतीनं तुमचं काम काही मिनिटांमध्ये होईल. (Step to Update Aadhaar Card Online for Free)

Advertisement

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी (Update Aadhaar online) तुम्हाला uidai च्या अधिकृत साईटवर जावं लागेल.

- सर्वात प्रथम गूगलवर UIDAI सर्च करा.
- तिथं तुम्हाला वर दिसणाऱ्या  uidai.gov.in वेबसाइटवर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला हवी ती भाषा निवडा. तुम्ही मराठीसह तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता
- पुढील स्क्रीनवर तुम्हा 'माय आधार' वर जाऊन लॉग इन करावं लागेल. इथं तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी OTP पाठवण्यात येईल. तो क्रमांक टाकून लॉग इन करता येईल.
- त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. त्यामध्ये सर्वात वर कागदपत्र अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. त्याचबरोबर ही सुविधा 14 जूनपर्यंतच uidai  साईटवर मोफत असल्याची सूचना दिली. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी ही सुविधा देण्यात येत आहे. 
- त्यामध्ये तुम्ही तुमची सर्व कागदपत्र अपडेट करा. तसंच तुमची जन्म तारीख, राहण्याचा पत्ता याची पडताळणी करा.
- सर्व माहितीची पडताळणी झाल्यानंतर तुमची ओळख पटण्यासाठी अ‍ॅड्रेस प्रुफ अपडेट करावे लागेल. या कागदपत्रांची साईज 2 MB पेक्षा कमी हवी. - तुम्ही  पीडीएफ,जेपीईजी, किंवा पीएनजी फॉर्मेटमध्ये कागदपत्र अपलोड करु शकता. 
- तुम्हाला पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिल लायसन्ससह त्या सूचीमधील कोणेतेही कागदपत्र पुरावा म्हणून अपलोड करता येईल.
सर्व डिटेल्स आणि कागदपत्र अपडेट झाल्यानंतर अपलोडच्या बटनावर क्लिक करा.
- आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर तुम्हाला एक 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. या नंबरच्या मदतीनं तुम्ही आधार अपडेट रिक्वेस्ट ट्रॅक करु शकता.  
- आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर UIDAI कडून तुम्हाला मेल किंवा मेसेज करण्यात येईल.