Love Story: खरे प्रेम! पत्नीच्या निधनानंतर पतीने बांधलं 65 लाखांचं मंदिर, ही लव्हस्टोरी तुम्हाला रडवेल

"जर माझ्याकडे 65 कोटी असते, तरी ते मी तिच्या चरणी अर्पण केले असते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Husband Builds Temple For Wife: प्रेम ही केवळ भावना नसून ती एक भक्ती असू शकते. याचा प्रत्यय बिहारमधील छपरा येथे आला आहे. एका पतीने आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ तब्बल 65 लाख रुपये खर्चून एक भव्य मंदिर उभारले आहे. या अनोख्या प्रेमाची आणि त्यागाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. बिहारच्या छपरा जिल्ह्यातून प्रेमाची एक अशी दास्तान समोर आली आहे, जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील. एका पतीने आपल्या पत्नीच्या प्रेमाला अमर करण्यासाठी 65 लाख रुपये खर्चून मंदिर बांधले आहे. ही संपत्तीचे प्रदर्शन नसून एका संघर्षात साथ देणाऱ्या अर्धांगिनीला दिलेली श्रद्धांजली आहे.

या व्यक्तीचा विवाह वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी झाला होता. त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र, पत्नीने पतीचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले. प्रसंगी विकले. कोणत्याही तक्रारीशिवाय तिने घर सांभाळले आणि पतीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी खंबीर साथ दिली. पत्नीची ही खंबीर साथ पतीच्या पथ्यावर पडली होती. त्या पाठिंब्याच्या जोरावर ते यशाला गवसणी घालण्यात यशस्वी झाले. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठा स्फोट अन् एकच धावपळ

तो पती आज यशस्वी झाला आहे. मात्र ज्या पत्नीने या यशासाठी रक्ताचे पाणी केले, ती आज या जगात नाही. पत्नीच्या निधनानंतर तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आणि तिने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून या पतीने 65 लाख रुपये खर्च करून मंदिरात पत्नीची मूर्ती स्थापन केली आहे. "जर माझ्याकडे 65 कोटी असते, तरी ते मी तिच्या चरणी अर्पण केले असते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

नक्की वाचा - Success Story: 12 वी नापास, सायकलवर दूधविक्री!, जिद्दीच्या जोरावर नाशिकच्या लेकाने दिल्ली गाजवली

या व्यक्तीचे लग्न खूप कमी वयात झाले होते. शिक्षण घेण्यासाठी पैसे नसताना पत्नीने आपले दागिने विकून पतीला पाठबळ दिले ही बाब आपण कधी ही विसरू शकत नाही असं त्याने सांगितलं. पती शिकून मोठा झाला, नाव कमावले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ज्या वेळी परिस्थिती सुधारली त्याच वेळी काळाने पत्नीवर घाला घातला. पत्नीचे अकाली निधन झाले. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पतीने थेट मंदिर बांधले. त्यांच्या कृतीचे सर्वांनीच कौतूक केले आहे. शिवाय हेच खरे प्रेम आहे असं ही सर्वच जण बोलत आहेत. 

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी