जाहिरात

Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठा स्फोट अन् एकच धावपळ

या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे.

Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठा स्फोट अन् एकच धावपळ
  • बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे अजित पवारांचे विमान २८ जानेवारी रोजी अपघातात कोसळले
  • विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे
  • स्फोटानंतर परिसरात धुराचा लोट पसरला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे गावकऱ्यांनी तिथून पळ काढला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

देवा राखुंडे 

अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांचे विमान कोसळले त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. पण आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो इतर व्हिडीओ पेक्षा वेगळा आहे. ज्यावेळी विमान कोसळले त्यावेळी त्याच जागी किती मोठा स्फोट झाला याचाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्या शिवाय राहाणार नाही. शिवाय या स्फोटानंतर काय झालं असेल याची कल्पना ही येते. हा नवा व्हिडीओ सध्या सगळीकडे जबरदस्त व्हायरल होत आहे.  

बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे 28 जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या विमानाता अपघात झाला आहे ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर अजूबाजूच्या गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा स्फो जबरदस्त होता. तो झाल्यावर गावकऱ्यांनी ही तिथून पळ काढला. 

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी

या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला व आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या विमानाचा स्फोट झाला त्यावेळी गावकरी तिथे होते. त्या पैकी एकाने विमान जळत असल्याचा व्हिडीओ तयार केला. 

नक्की वाचा - Success Story: 12 वी नापास, सायकलवर दूधविक्री!, जिद्दीच्या जोरावर नाशिकच्या लेकाने दिल्ली गाजवली

त्याला त्यावेळी काही स्फोट होईल अशी कल्पना नव्हती. तो अगदी विमानाच्या जवळ होता. त्याच वेळी जोरात स्फोट झाला. त्यामुळे जवळ असलेलो लोक आणि व्हिडीओ काढणारी व्यक्ती तिथून पळत सुटली. व्हिडीओमध्ये या सर्व गोष्टी शुट झाल्या आहेत. हा व्हिडीओ आता  समोर आला आहे. यात विमानाला प्रचंड आग लागल्याचे दिसत आहे. शिवाय लोकांचा आरडाओरडा आणि पळापळ ही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकल्या शिवाय राहात नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com