Hyderabad Fire : हैदराबादमध्ये चारमीनारजवळील इमारतीला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू

आतापर्यंत या इमारतीतून 14 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यातील कित्येक जण गंभीर जखमी आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

हैदराबादच्या ऐतिहासिक चारमीनारजवळील गुलजार हौज भागात रविवारी सकाळी भीषण आगीचे घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेजक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच पोलिसांची टीम आणि फायर ब्रिगेडची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. ही घटना रविवारी सकाळी पहाटे 5 ते 6 वाजेदरम्यान घडली. अद्याप आगीचं अधिकृत कारण कळू शकलेलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागल्याची शक्यता आहे. सध्या फायर ब्रिगेडच्या ११ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करीत आहेत. याशिवाय 10 रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात आहेत. 

नक्की वाचा - UP Bus Fire : बसने अचानक पेट घेतला, आपत्कालीन दरवाजाने घात केला; 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू

    14 जणांना रेस्क्यू केलं...
    या इमारतीत चारहून जास्त कुटुंब राहत होती. याशिवाय 30 हून जास्त लोक राहत असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या इमारतीतून 14 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यातील कित्येक जण गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनुसार या इमारतीतीत 30 हून अधिक लोक राहत होते. 

    Advertisement

    हैद्राबाद आग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट...

    या दुर्घनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना प्रत्येक 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये देण्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं.