Viral Video: तेलंगाणा राज्यातील हैदराबाद येथील हिट अँड रन प्रकरणी (Hyderabad Hit And Run) पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक चालकाला अटक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रकच्या पुढील चाकामध्ये बाइक अडकल्याचे दिसत आहे. पण ट्रक चालकाने वाहन थांबवण्याऐवजी बाइक तशीच फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडीओद्वारे समोर आला. दुसरीकडे बाइकस्वार ट्रकच्या दरवाज्यावर लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ट्रक चालकाच्या या निर्दयी वृत्तीवर सोशल मीडियावर युजर्स संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताहेत.
🚒#ViralVideo A speeding motorcycle got stuck under a truck on a busy road.#Hyderabad #Viral #Video #Accident |@HYDTP pic.twitter.com/oQXZcs0jNY
— unknown 👸 (@rupendr74016060) April 17, 2024
बाइकस्वाराकडून तक्रार दाखल
बाइकस्वाराने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली. ही घटना रविवारी (14 एप्रिल) घडल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील रहिवासी असणाऱ्या अब्दुल मजीद (वय 60 वर्षे) यांनी सोमवारी (15 एप्रिल) ट्रक चालकाविरोधात तक्रार दाखल केली.
ट्रकने फरफटत नेल्याने बाइकचे मोठे नुकसान
मजीद यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की,14 एप्रिल रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास बाइकने आरामघरहून लक्ष्मी गार्डनच्या दिशेने प्रवास करत होतो. यादरम्यान एका भरधाव ट्रकने त्यांच्या बाइकला धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे अब्दुल रस्त्यावर पडले, पण चालकाने ट्रक थांबवला नाही. उलट तेथून पळ काढला कारण रस्त्यावरील लोकांनी ही घटना मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यास सुरुवात केली. सुदैवाने बाइकस्वाराला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण यामध्ये त्यांच्या बाइकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ट्रकची आणखी एका कारला धडक
धक्कादायक बाब म्हणजे चंपापेट टी-जंक्शनवर याच ट्रकने आणखी एका कारला देखील धडक दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
सांगलीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
उष्णतेची लाट कायम राहणार तर काही ठिकाणी मुसळधार
बायकोचं इन्क्रिमेंट होत नाही म्हणून संतापला नवरा, रागाच्या भरात बॉसवरच केला हल्ला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world