'मी कोट्यधीश आहे, स्ट्राँग आहे', डबल M.A. PhD असूनही रस्त्यावर चहा विकत आहे 'ही' महिला

रस्त्यावर चहाची विक्री आणि रोज फुटपाथवर झोपावं लागत असूनही या महिलेनं जिद्द सोडलेली नाही.

Advertisement
Read Time2 min
'मी कोट्यधीश आहे, स्ट्राँग आहे', डबल M.A. PhD असूनही रस्त्यावर चहा विकत आहे 'ही' महिला
चाय बेचकर न सिर्फ अपना बल्कि दूसरो का भी पेट भरती हैं
मुंबई:

नशीब आणि परिस्थितीमुळे एखाद्यावर कोणतंही काम करण्याची वेळ येते. पण काही जण आपलं नशीब स्वत: घडवतात. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभव स्विकारत नाही. आम्ही आज ज्या महिलेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्या देखील अशाच धैर्यशाली आहेत. त्यांनी आयुष्यातील बिकट परिस्थितीमध्येही धीर सोडलेला नाही. त्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण त्यांची प्रशंसा करत आहेत.  डबल एमए, पीएचडी असलेल्या या महिलेवर चहा विकण्याची वेळ का आली? त्यामध्येही त्या कशा पद्धतीनं दुसऱ्यांना आधार देत आहेत हे पाहूया 


फुटपाथवर विकतात चाहा 

jalandharwaleofficial ऑफिशियल या इन्स्टाग्राम हँडलवर या महिलेचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये त्या फुटपाथवर बसून चहा करत आहेत. त्यांना हे दुकान सुरु का केलं? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 'मला नोकरी मिळत नाही, म्हणून मी हे काम करत आहे,' असं त्यांनी सांगितलं. आपण डबल एमए असून पीएचडी असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या सध्या फुटपाथवर झोपतात. नवी दिल्लीतल्या Lady Hardinge Hospital च्या गेटसमोर त्यांचं चहाचं दुकान आहे.

देखें Video:

चहा आणि परोपकार

चहाचा स्टॉल चालवणाऱ्या या महिला इतरांना मदत करण्यास नेहमी आघाडीवर असतात. त्यांच्या स्टॉलवर कुणीही येऊन मोफत पाणी पिऊ शकतं. तसंच सर्वांना हात आणि तोंड धुण्याचीही परवानगी आहे. हॉस्पिटलमधून आलेल्या गरजू लोकांची त्या मोफत सेवा करतात. त्याचबरोबर एखादी मुलगी आपल्यासोबत काम करण्यासाठी तयार झाली तर मी तिला रोजचा 300 रुपये पगार देईल, असंही त्यांनी सांगितलं. 'मी कोट्यधीश आहे, स्ट्रॉंग आहे, ' असा दावा त्यांनी केलाय. या महिलेच्या निश्चयाला सोशल मीडियावर युझर्सनी सलाम केलाय.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: