PM Modi First Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान यांनी यावेळी त्यांचे मित्र आणि शिक्षकांबद्दलच्या आठवणी देखील सांगितल्या. शाळेतील जुन्या मित्रांना घरी बोलावलं त्यावेळी काय झालं हे मोदींनी यावेळी सीांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान?
मित्रांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी लहान वयातच घर सोडलं होतं. घरच नाही तर सर्व काही सोडलं होतं. कुणाशी संबंध नव्हता. पण, मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी वर्गातील मित्रांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावावं असं, मला वाटलं.
मी कुणी 'तीस मारखा' आहे, असं त्यांना वाटावं ही माझी इच्छा नव्हती. माझ्यात काहीही बदल झाला नव्हता. मला त्या क्षणाला जगायचं होतं. मी सर्वांना बोलावलं होतं. रात्री भरपूर जेवण केलं. गप्पा मारल्या. पण, मला फार आनंद मिळाला नाही. कारण, मी मित्र शोधत होतो. त्यांना मुख्यमंत्री दिसत होता. माझ्या आयुष्यात आता मला तू म्हणनारा कुणीही उरलं नाही. संपर्कात अजूनही आहेत, पण सर्वजण आदरानं वागतात, असं पंतप्रधान म्हणाले.
(नक्की वाचा : 'मी देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात', मोदींनी सांगितली 'मन की बात' )
शिक्षकांबद्दल काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं की मी एक सामान्य विद्यार्थी होते. शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करत. मी माझ्या शिक्षकांचा सार्वजनिक सन्मान करावा अशी माझी इच्छा होती. मी सर्वांना शोधलं आणि त्यांचा सार्वजनिक सन्मान केला. राज्यपाल देखील त्या कार्यक्रमाला आले होते.
( नक्की वाचा : River Linking : PM मोदींनी केला नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास, कशी होते नद्यांची जोडणी? काय होणार फायदे?)
मी आज जे काही आहे, मला घडवण्यात त्यांचंही योगदान आहे, हा माझा भाव होता. मी माझ्या 30-32 शिक्षकांना बोलावलं आणि त्यांचा सन्मान केला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला क्षण होता, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.