जाहिरात

PM Modi First Podcast : 'मी देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात', मोदींनी सांगितली 'मन की बात'

PM Podcast With Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्यांवर मनमोकळं मत व्यक्त केलं.

PM Modi First Podcast : 'मी देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात', मोदींनी सांगितली 'मन की बात'
मुंबई:

PM Modi First Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्यांवर मनमोकळं मत व्यक्त केलं. राजकारणात चांगले लोकं आली पाहिजेत, यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिली. नव्या लोकांनी राजकारणात महत्त्वकांक्षा नाही तर मिशनसह आलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मी मनुष्य आहे, देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या पॉडकास्टमध्ये निखिल कामतनं पंतप्रधान मोदींना सांगितलं की, 'मी इथं तुमच्यासमोर बसलो आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. मला भीती वाटतीय. माझ्यासाठी ही कठीण चर्चा आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, 'हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मला माहिती नाही की हा तुमच्या प्रेक्षकांना कसा वाटेल. वाईट हेतूनं कोणतंही चुकीचं काम करु नका हा माझा जीवनाचा मंत्र आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. 

पंतप्रधानांनी सांगितलं की, मी खूप सामान्य विद्यार्थी होतो. शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करत. त्यांनी राजकारणात चांगल्या व्यक्ती आल्या पाहिजेत, असं सांगितलं. त्यांनी महत्वकांक्षेसह नाही तर मिशनसह आलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. मी मनुष्य आहे. कुणी देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात, अशी कबुली त्यांनी या पॉकास्टमध्ये दिली.

पंतप्रधानांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्री झाल्यावर एक भाषण केलं होतं. त्यामध्ये मी कठोर परिश्रमापासून मागे हटणार नाही. स्वत:साठी काही करणार नाही, असं सांगितलं होतं. मी माणूस आहे. चुका करु शकतो, पण, कधीही वाईट वृत्तीनं काही चूक करणार नाही. हा माझा आयुष्याचा मंत्र आहे. शेवटी मी माणूस, कुणी देव नाही. '

निखिल कामतनं यावेळी पंतप्रधानांना जगभरात सुरु असलेल्या युद्धावरही प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, 'या संकटाच्या काळात आम्ही तटस्थ नाही, हे मी सतत सांगितलं आहे. मी सतत सांगतोय की मी शांततेच्या पक्षात आहे, असं पंतप्रधान यावर म्हणाले.'

( नक्की वाचा : River Linking : PM मोदींनी केला नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास, कशी होते नद्यांची जोडणी? काय होणार फायदे?)

या चर्चेच्या दरम्यान निखिलनं स्वत:चा अनुभव देखील शेअर केला. मी मोठा होत असताना राजकारणाकडं नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जात असे. तुम्ही हे कसं पाहता, त्यावर तुम्हाला तुमच्या जुन्या गोष्टींवर विश्वास असता तर आपण ही चर्चा करत नसतो,' असं उत्तर पंतप्रधानांनी दिलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com