Srinagar Blast: श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट! 7 मृत्यू, 27 जखमी, हादरवणारा VIDEO

पोलिस कर्मचारी हरियाणातील फरीदाबाद येथून आणलेले स्फोटक पदार्थ हाताळत असताना हा स्फोट झाला असे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Srinagar Explosion Viral Video:  जम्मू काश्मिरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे एका पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या स्फोटकांचा मोठा साठा स्फोटात झाला, या स्फोटोमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत.  जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीनगरच्या बाहेरील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण ठार झाले आणि २७ जण जखमी झाले. अलिकडच्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून अधिकारी नमुने घेत असताना हा स्फोट झाला. मृत्यूंमध्ये पोलिस आणि फॉरेन्सिक अधिकारी होते. पोलिस कर्मचारी हरियाणातील फरीदाबाद येथून आणलेले स्फोटक पदार्थ हाताळत असताना हा स्फोट झाला असे त्यांनी सांगितले.

Madha News: 'हॉटेल 7777' च्या मालकाची मुजोरी! कर्मचाऱ्याला सर्वांसमोर नग्न करुन बेदम मारलं, VIDEO व्हायरल

जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी सुरक्षा दल, स्निफर डॉगसह दाखल झाले आहेत. श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.अटक केलेल्या डॉक्टर मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या ३६० किलोग्रॅम स्फोटकांचा भाग असलेल्या या साहित्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. 

 शहरातील विविध रुग्णालयात किमान २४ पोलिस आणि तीन नागरिकांना दाखल करण्यात आले. या प्रचंड स्फोटाने रात्रीची शांतता भंग केली आणि पोलिस स्टेशनच्या इमारतीचे नुकसान झाले. जखमी पोलिसांना शहरातील विविध रुग्णालयात नेण्यात आले. लहान स्फोटांच्या सततच्या मालिकेमुळे बॉम्ब निकामी पथकाच्या तात्काळ बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला.

Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट