जाहिरात

Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट

Raigad Missing Girl Case: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात 4 वर्षांची चिमुकलीच्या अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनाची आणि गावकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.

Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट
Raigad News: 48 तास उलटूनही चिमुकलीचा कोणताही शोध लागत नसल्याने परिसरात काळजीचे वातावरण आहे. (प्रतिकात्मक फोटो )
रायगड:

मेहबूब जमादार, प्रतिनिधी 

Raigad Missing Girl Case: रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात हेटवणे वाडीमध्ये 4 वर्षांची चिमुकलीच्या अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनाची आणि गावकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. बुधवारी (12 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेला  48 तास उलटूनही मुलीचा शोध लागलेला नाही.

नेमकी घटना काय?

पीडित  (वय 4 वर्षे 6 महिने)  चिमुकली तिच्या आईसोबत गावाबाहेर एका नाल्याशेजारी असलेल्या शौचालयाला गेली होती. आईने मुलीला बाजूला उभे केले आणि ती आत गेली. काही क्षणातच किशोरीने "आई कुठे आहेस तू?" असा आवाज दिला, त्यावर आईने "बाळा, आलोच मी" असे उत्तर दिले. मात्र, फक्त 5 मिनिटांच्या अवधीत आई बाहेर येईपर्यंत किशोरी तिथून बेपत्ता झाली होती.

शोधकार्यामध्ये आव्हान

आपली चिमुकली दिसेनाशी झाल्याने आईने त्वरित आरडाओरड केली. मुलगी घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी एकत्रितपणे शोधकार्य सुरू केले. हेटवणे वाडी गावाला लागूनच घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसराचा शोध घेतला, पण त्यानंतरही मुलीचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

( नक्की वाचा : Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये ट्रॅफिक पोलिसांचे ‘रेट कार्ड' चर्चेत? पोलीस मस्त, प्रवासी त्रस्त )
 

48 तासानंतर मोठा ट्विस्ट

शोधकार्यात अनेक तास उलटून गेल्यानंतर नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी तातडीने रवाना करण्यात आले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. दरम्यान, गावकरी जंगलात शोध घेत असताना त्यांना बेपत्ता चिमुकलीची चप्पल आणि ड्रेस सापडले. मुलीचे कपडे आणि चप्पल मिळाल्याने या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आहे.

या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ 'ॲक्शन मोड'मध्ये येत व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे. शोधकार्यासाठी सीआरपी (CRPF), क्यूआरटी (QRT), श्वान पथक आणि खोपोली येथील हेल्प फाउंडेशन (Help Foundation) या बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. परिसरातील चारही दिशांना कसून शोध घेतला जात आहे. मात्र, 48 तास उलटूनही चिमुकलीचा कोणताही शोध लागत नसल्याने परिसरात काळजीचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com