IIT उत्तीर्ण तरीही बेरोजगार; यंदा 38 % आयआयटीयन्सना प्लेसमेंट नाही!

एकदा आयआयटी उत्तीर्ण झालात की बड्या पगाराची नोकरी किंवा परदेशात जाण्याची संधी नक्की असल्याचं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळत होतं. मात्र एका आरटीआयमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

IIT मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आजही प्रचंड मेहनत करावी लागते. देशातील नामांकित आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करीत असतात. एकदा आयआयटी उत्तीर्ण झालात की बड्या पगाराची नोकरी किंवा परदेशात जाण्याची संधी नक्की असल्याचं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळत होतं. मात्र एका आरटीआयमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी आरटीआयच्या माध्यमातून मोठी माहिती उघड केली आहे. यानुसार आयआयटीच्या सर्व 23 कॅम्पसमधील तब्बल 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार असून अद्यापही त्यांना नोकरी मिळालेली नाही. आयआयटी दिल्लीने आपल्याकडील माजी विद्यार्थ्यांना ईमेल करीत सद्याच्या बॅचमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी आणि त्यांची  शिफारस करण्यासाठी मदत मागितली आहे. आयआयटी बॉम्बे आणि बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सनेही आपल्या माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागितली आहे. 

आयआयटी दिल्लीमध्ये 2023-24 मधील प्लेसमेंटचं सत्र संपत आहे. मात्र विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. या आरटीआयनुसार, आयआयटीमधील तब्बल 400 विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळू शकलेली नाही. 

बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सने पहिल्यांदा दोन महिन्यापूर्वी माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागितली आहे. आयआयटी बॉम्बेनेदेखील माजी विद्यार्थ्यांची संपर्क केला आहे. या महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट अद्यापही सुरू आहे आणि जूनच्या शेवटपर्यंत चालेल. प्लेसमेंटमध्ये सहभागी झालेल्या बॅचमधील तब्बल 10 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळू शकलेली नाही. आरटीआयनुसार, गेल्या वर्षी 329 विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Explainer : मतदानाच्या टक्केवारीचा वाद, 1.07 कोटी मते कशी वाढली?

बिट्स समुहाचे कुलगुरू वी रामगोपाल राव म्हणाले, प्रत्येक ठिकाणी 20 ते 30 टक्के प्लेसमेंट कमी आहे. जर कोणत्याही संस्थेकडून सांगितलं जात असेल की त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तर नोकरीच्या गुणवत्ता चांगली नसेल. हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा चॅटजीपीटी आणि मोठे लॅग्वेज मॉडेलनी आपले परिणाम दाखवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी सर्व 23 IIT मधील 7000 हून अधिक आयआयटी विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी मिळू शकलेली नाही. दोन वर्षांपूर्वी हा आकडा 3,400 होता. नोकरी मिळण्याचा टक्का कमी होत असताना प्लेसमेंटसाठी पात्र होणाऱ्यांची संख्या 1.2 पटीने वाढली आहे. 

Topics mentioned in this article