Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने 6-7 मे रोजी मध्य रात्री पाकिस्तानात जवळपास 100 किमी आत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याला 'प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार' वापरला आहे , असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
भारतील लष्कराने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करत 9 दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा समावेश आहे. तिन्ही दलांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन सिंदूर राबवलं. भारताने यातून आपली ताकद शत्रूराष्ट्रांना दाखवून दिली आहे. या विध्वंसाचे काही सॅटलाईट फोटो समोर आले आहे. ANI ने बहावलपूर आणि मुरीदके आणि इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची काही सॅटलाईट फोट शेअर केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सॅटलाईट फोटोंमधून दहशतवादी तळांच्या विध्वंसाच्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर आणि मुरीदके हे जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाचे गड आहेत. येथूनच या दोन्ही संघटना दहशतवादी कट कारस्थान करतात. जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये होते आणि लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय मुरीदकेमध्ये होते. मात्र भारताने दोन्ही संघटनांचे अक्षरश: कंबरडं मोडलं आहे.
(नक्की वाचा- भारताची नारी शक्ती! सोफिया कुरैशी-व्योमिका सिंहची सोशल मीडियावर चर्चा; भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव मॅक्सार टेक्नॉलॉजीजच्या मदतीने बहावलपूर आणि मुरीदके शहरांमध्ये झालेल्या विध्वंसाचे फोटो घेण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी आणि नंतर बहावलपूरमधील जामिया मशिदीचे आणि पाकिस्तानमधील मुरीदकेचे झालेले नुकसान दिसून येते. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, 6-7 मे च्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तान आणि पीओके दोन्हीमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले झाले. यावेळी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. (नक्की वाचा- Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?25 मिनिटात दहशतवाद्यांची 21 ठिकाणं उद्ध्वस्त
भारताने हल्ला केलेली दहशतवादी ठिकाणे