Operation Sindoor : भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानचा मोठा प्रयत्न निष्फळ झाला आहे. भारतानं दिलेल्या उत्तरामध्ये पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्तानकडून भारतामधील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. पण, भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतानं उत्तर देताना केलेल्या कारवाईत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे नष्ट केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
15 शहरांवरचा हल्ला हाणून पाडला
अवंतीपुरा
श्रीनगर
जम्मू
पठाणकोट
अमृतसर
कपुर्तला
जालंधर
लुधियाना
उधमपूर
भटिंडा
चंदीगड
नाल
पालोडी
उत्तरलाई
भूज
या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. तो प्रयत्न भारतानं हाणून पाडला आहे.
न्यूज एजन्सी एनआयनं दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी भारतीय सशस्त्र दलानं पाकिस्तानचे अनेक ठिकाणं तसंच एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमनं लक्ष्य केलं. पाकिस्ताननं केलेल्या प्रयत्नाला भारतानं चोख उत्तर दिलं. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निष्प्रभ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Operation Sindoor : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ )
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (Line of Control) मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू ठेवला आहे. पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह सोळा निरपराध लोकांचा बळी ही गेला आहे.
पाकिस्तान गोळीबारासह तोफांचा ही मारा सीमेवर करत आहेत. काल रात्री, भारतीय हवाई दलाच्या एस-400 सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने, भारताच्या दिशेने पाकिस्तानने सोडलेल्या मिसाईलवर गोळीबार केला. या कारवाईत मिसाईल निष्प्रभ करण्यात आले आहे.एएनआयला ही माहिती मिळाली आहे. त्याला अधिकृत सरकारी दुजोरा मिळणे बाकी आहे.