भारतात वाढत्या लोकसंख्येसोबतच हलाल मांस आणि हलाल खाद्यपदार्थांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल मार्केट इंटेलिजेंस अँड कंसल्टेंसी फर्म केन रिसर्च यांनी भारतातील हलाल खाद्य बाजारावर प्रकाशित केलेल्या 'India Halal Food Market Outlook to 2030' या अहवालात म्हटले आहे की, देशातील हलाल खाद्य बाजाराचे मूल्य 19 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे.
केन रिसर्चच्या अंदाजानुसार, मुस्लीम ग्राहकांबरोबरच आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या गैर-मुस्लीम ग्राहकांकडूनही हलाल खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे भारतातील हलाल खाद्यपदार्थांचा व्यवसाय सतत विस्तारत आहे.
हलाल खाद्यपदार्थांची मागणी प्रामुख्याने हैदराबाद, लखनौ आणि मुंबई या शहरांमध्ये सर्वाधिक आहे. जिथे मुस्लीम लोकसंख्या लक्षणीय आहे. या शहरांनी मजबूत सप्लाय चेन स्थापित केल्या आहेत आणि त्यामुळे ही शहरे हलाल-प्रमाणित खाद्य उत्पादनांची प्रमुख केंद्रे बनली आहेत. केन रिसर्चनुसार, भारतीय हलाल खाद्यपदार्थांची निर्यातही वाढली आहे, विशेषत: आखाती सहकार्य परिषद (GCC) आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये ही निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
बाजारपेठेत सक्रिय कंपन्या
भारतातील हलाल खाद्य बाजारपेठेत एलानासन्स प्रायव्हेट लिमिटेड, अल कबीर ग्रुप, अमारा हलाल फूड्स, बीआरएफ एस.ए. आणि नेस्ले एस.ए. यांसारख्या प्रमुख कंपन्या सक्रिय आहेत. त्यांची मजबूत सप्लाय चेन, निर्यात क्षमता आणि ब्रँड ओळख यामुळे त्यांनी बाजारात आपले वर्चस्व राखले आहे.
बाजारातील वाढीची कारणे आणि आव्हाने
हलाल-प्रमाणित उत्पादनांची वाढती मागणी, मुस्लीम लोकसंख्येची वाढ आणि हलाल उत्पादनांसाठी ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मचा विस्तार यामुळे हा बाजार वाढत आहे. हलाल प्रमाणन मानकांचे पालन करणे, सप्लाय चेन कायम राखणे आणि विशेषतः देशाच्या गैर-मुस्लीम क्षेत्रांमध्ये हलाल प्रमाणनाबद्दल ग्राहकांची जागरूकता वाढवणे यासारख्या आव्हानांचा सामना कंपन्यांना करावा लागतो.
(नक्की वाचा- Video :"रतन टाटाजी माझ्या कंपनीत..",महिला ताज हॉटेलच्या मॅनेजरवर भडकली, बसण्याच्या स्टाईलमुळे झाला वाद अन्..)
म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत भारताचा दबदबा
भारत सरकारच्या वैधानिक संस्था असलेल्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) नुसार, भारत जगातील दहावा सर्वात मोठा म्हशीच्या मांसाचा निर्यातदार देश आहे. ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि कॅनडा हे या उत्पादनाचे प्रमुख निर्यातदार आहेत.