पावसाची ओढ...सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढणार; धक्कादायक आकडेवारी समोर

मार्केट एक्सपर्टनुसार, जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत देशभरात चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत फळ, भाज्या आणि धान्याच्या किमती कमी होण्याची आशा कमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • जून महीने में खुदरा महंगाई दर बढ़कर 4.33 प्रतिशत हो गई, जो मई के मुकाबले अधिक है
  • ग्रामीण इलाकों में महंगाई का असर शहरी क्षेत्रों की तुलना में अधिक देखा गया, जून में ये 4.74 प्रतिशत रही
  • कपड़े, जूते, ट्रांसपोर्ट सर्विसेज, हाउसिंग और हेल्थ सर्विसेज की कीमतों में जून में सालाना आधार पर इजाफा हुआ है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा महागाईचा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) किंवा किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचं प्रमाण यंदा कमी असल्यामुळे हे आकडे पाहून सर्वसामान्यांसह सरकारची चिंताही वाढणार आहे. जूनमध्ये रिटेल इन्फ्लेशन वाढून ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मे महिन्यात ३.९३ टक्के इतका होता. ही वाढ मागील महिन्याहून जास्त आहे. याशिवाय हे बाजाराच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे. तज्ज्ञांनी जूनमध्ये हे प्रमाण सुमारे ४.२% असेल असा अंदाज वर्तवला होता.

थाळी झाली महाग...

यंदा महागाई वाढण्याचं सर्वात मोठं कारण खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किमतीत झालेली वाढ आहे. या आकड्यांनुसार...

खाद्यपदार्थ महागले, मे महिन्यात ४.७८ टक्क्यागून वाढलं आणि जूनमध्ये ५.३२ टक्क्यांवर पोहोचलं. फूड अँड बेव्हरेजमध्ये वार्षिक आधारावर ५.०५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

Advertisement

गावात महागाईचा अधिक फटका...

शहराच्या तुलनेत गावांत महागाईचा परिणाम सर्वाधिक पाहायला मिळत आहे. जून महिन्यात ग्रामीण भागात महागाई वाढून ४.७४ टक्के झाली आहे, हाच आकडा मे महिन्यात ४.२५ टक्क्यांच्या स्तरावर होता. 

काय काय महाग?

जूनमध्ये केवळ खाण्या-पिण्याचे पदार्थच नव्हे तर नियमित लागणाऱ्या अनेक वस्तूही महाग झाल्या. कपडे आणि शूजच्या किमतीत वार्षिक आधारावर ३.२३ टक्क्यांची वाढ झाली. तर ट्रान्सपोर्टशी संबंधित सर्व्हिस ४.३१ टक्के महाग झाली आहे. ज्यामुळे लोकांचा प्रवासाचा खर्च वाढला आहे. घराशी संबंधित खर्च उदा, हाऊसिंग आणि युटिलिटी सर्व्हिसमध्ये १.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर हेल्थ सर्व्हिसदेखील १.४२ टक्क्यांनी महाग झाली आहे. याचा अर्थ असा की, जून महिन्यात सर्वसामान्य लोकांना अनेक जीवनावश्यक खर्चांसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले.

मान्सूनच्या विलंबामुळे गणित बिघडलं...

सर्वसाधारणपणे जून महिन्यात मान्सून देशभरात सक्रिय होतो. मात्र यंदाच्या वर्षी मान्सूनची गती अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने आहे. अनेक मोठ्या कृषी प्रधान राज्यांत सुरुवातीला कमी पावसामुळं पिकांच्या पेरणीवर परिणामी झाला. मार्केट एक्सपर्टनुसार, जोपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होत देशभरात चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत फळ, भाज्या आणि धान्याच्या किमती कमी होण्याची आशा कमी आहे.

व्याजदर कमी होण्याची शक्यता कमीच...

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने, किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांवर ठेवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मे महिन्यात महागाईचा दर ३.९३ टक्क्यांवर आली होती, तेव्हा अपेक्षा होती की, आरबीआयचा त्रास पुन्हा वाढू शकतो. अशा स्थितीत व्याज दर कमी करण्याची प्रतीक्षा अधिक वाढू शकते. 

Advertisement