कसं झालं होतं 1971 चं युद्ध? कोणत्या देशांची होती पाकिस्तानला साथ, कुणी केली होती अमेरिकेची कोंडी?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

India Pakistan Conflict: जगाच्या राजकीय नकाशात 1971 मधील डिसेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. याच महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 13 दिवसांचे युद्ध झाले. त्यानंतर बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. त्यापूर्वी पाकिस्तानच्या 90 हजार सैन्यानं पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खा नियाचीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरांच्यासमोर शरणागती पत्कारली होती. ही जगातील सर्वात मोठी शरणागती आहे. त्या युद्धात भारताचा खूप मोठा विजय झाला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

1971 मध्ये अरब देश आणि पश्चिमी राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूनी होती. आता 54 वर्षांनी पुन्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही युद्धाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 1971 ते 2025 या काळात जग किती बदललं आहे आणि आता पाकिस्तानबरोबर कोण उभं आहे हे पाहूया 

कुणी केली होती अमेरिकेची कोंडी?

1971 च्या युद्धात अमेरिकेनं पाकिस्तानची मदत केली होती. अमेरिकेनं पाकिस्तानला शस्त्र आणि पैशांची मदत केली. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांकडं मदतीची याजना केली होती. त्यानंतर अमेरिकेनं सातवं आरमार बंगालच्या उपसागरात पाठवण्याचा निर्णय घेतला.

USS Enterprise नावाचा हा ताफा अणुऊर्जेवर चालत होता. त्यात सात विनाशक, एक हेलिकॉप्टर वाहक यूएसएस त्रिपोली आणि एक तेल टँकर यांचा समावेश होता.एकदा इंधन भरले की ते इंधन न भरता जगभर प्रवास करू शकते यावरून त्याची क्षमता तुम्हाला लक्षात येईल. 

अमेरिकेच्या सातव्या आरमाराचा प्रतिकार करण्यासाठी सोव्हिएट रशियानं एक मोठा ताफा पाठवला होता. हा ताफा अमेरिकन ताफ्याच्या मागेच होता. अमेरिकेच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी हा ताफा सज्ज होता. पण, त्याची वेळ आलीच नाही. पाकिस्तानच्या सैन्यानं शरणागती पत्कारल्यानंतर अमेरिकेचे सातवे आरमार परत फिरले.

Advertisement

( नक्की वाचा :  रात्रीच्या आंधारात पाकिस्तानच्या JF-17 ला दाखवले पाताळ, काय आहे भारताचे 'आकाश' )
 

चीन आणि श्रीलंकेनंही केली होती मदत

1971 च्या युद्धात पाकिस्तानला मदत करणारा अमेरिका हा एकमेव देश नव्हता. चीननं पाकिस्तानला साथ दिली होती. चीननं बराच काळ बांगलादेशच्या फाळणीला मान्यता दिली नव्हती. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वासाठी चीननं अर्ज केला होता. त्यावेळी चीननं व्हेटो वापरला होता. चीननं 1975 साली बांगलादेशला मान्यता दिली. 

श्रीलंकेनंही त्यांच्या भंडारनायके विमानतळावर पाकिस्तानचे लढाऊ विमानं उतरण्यास आणि त्यांना इंधन भरण्यास परवानगी दिली होती. 

अरब विश्वाचीही पाकिस्तानला साथ

त्या काळात जगात शीतयुद्ध सुरु होते. सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन महासत्ता होत्या. बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात विभागले होते. अरब देशांनी या युद्धात पाकिस्तानला मदत केली. जॉर्डन आणि सौदी अरेबियानं पाकिस्तानला मदत करावी यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केले होते. त्यांनी दोन्ही देशांच्या राजांना पत्र लिहून मदत करण्याची सूचना केली होती. तसंच लिबियानं देखील पाकिस्तानच्या मदतीला लढाऊ विमानं तैनात केले होते. इराणनंही पाकिस्तानला शस्त्रांची मदत केली होती.

Advertisement

आता किती बदललं जग?

आता जग पूर्णपणे बदललं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी या युद्धात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. 1971 च्या युद्धात पाकिस्तानला मदत करणाऱ्या बहुतेक देशांचे भारताची चांगले संबंध आहेत. तर त्यांचे आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. 

अमेरिकेला आता अफगाणिस्तानमध्येही काहीही रस नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी पाकिस्तानही महत्त्वाचा नाही. आज फक्त चीन पाकिस्तानच्या बाजूनं भक्कम उभा आहे. चीननं पाकिस्तानात मोठी गुंतवणूक केलीय. पण, चाीन आणि भारतामधील व्यापार हा चीन आणि पाकिस्तानमधील व्यापारापेक्षाही मोठा आहे. 

Advertisement