
India Strike Pakistan: भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलंय. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पाकिस्तानचा प्रत्येक वार परतवण्याचं सामर्थ्य भारताकडं आहे. पाकिस्तानची लढाऊ विमानं भारताच्या दिशेनं झेपावली तेव्हा आपल्या बॉर्डरवर सज्ज असलेल्या क्षेपणास्त्रांनी ती खाली पाडली. भारताकडून पाकिस्तानची 4 लढाऊ विमानं पाडल्याचं वृत्त आहे. त्यामध्ये 2 एफ-16, आणि 2 जेएफ-17 चा समावेश आहे. पाकिस्तानचे एक जेफ-17 भारताच्या आकाश क्षेपणास्त्रांनं (Akash Missile) निकामी केलं असं सांगितलं जातं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आकाश क्षेपणास्त्राच्या डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे JF-17 खाली पाडले. आकाशची क्षमता काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारतीय सैन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'भारतीय सैन्याशी संबंधित एका संरक्षण अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'भारतीय लक्ष्यांवरील पाकिस्तानी हल्ले हाणून पाडण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. भारतीय सैन्य आणि वायू दल दोन्हीकडे ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. पाकिस्तानच्या सीमेवर हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहे.
असुरक्षित क्षेत्रे आणि संवेदनशील ठिकाणांचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आकाश ही कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. आकाश शस्त्र प्रणाली ग्रुप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्यांना व्यस्त ठेवू शकते. हे इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटर मेजर्स (ECCM) वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहे. संपूर्ण शस्त्र प्रणाली मोबाईल प्लॅटफॉर्मवर कॉन्फिगर केली आहे.
( नक्की वाचा : 'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video )
कसे आहे आकाश क्षेपणास्त्र?
- 'आकाश प्राईम' ही आकाश क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे.
- 27 सप्टेंबर 2021 रोजी एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) चांदीपूर, ओडिशा येथून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- या चाचणीमध्ये, क्षेपणास्त्राने पहिल्या उड्डाणात शत्रूच्या विमानाच्या आकारात बनवलेले मानवरहित हवाई लक्ष्य रोखले आणि नष्ट केले.
- आकाश प्राईम सध्याच्या आकाश प्रणालीच्या तुलनेत अधिक अचूकतेसाठी स्वदेशी सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सीसह (RF) सुसज्ज आहे.
- जास्त उंचीवर तसंच कमी तापमानामध्येही अचूक कामगिरी करता यावी यासाठी क्षेपणास्त्रामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
किती घातक आहे आकाश?
- लांबी - 5.6 मीटर
- शस्त्र - 60 किलोपर्यंत वॉरहेडची क्षमता
- मारा - 25 किलोमीटर दूरपर्यंत वार करण्याची क्षमता
- चपळाई - डोळ्यची पापणी मिटण्याच्या आत शत्रूचा खात्मा
- सर्व हवमानात काम करण्याची क्षमता
- संपूर्ण स्वदेशी
- पूर्णपणे ऑटोमॅटिक
- कोणत्याही ठिकाणी तैनात करण्याची क्षमता
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world