भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर झाला मार्ग मोकळा

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली होती. ट्रम्प यांनी सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर एक पोस्ट करत भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार झाल्याचा दावा केला.

ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं होतं की,'रात्री अमेरिकेच्या मध्यस्थीमध्ये झालेल्या मोठ्या चर्चेनंतर मला हे सांगायला आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान तातडीनं आणि संपूर्ण युद्धविरामाला तयार झाले आहेत. मी दोन्ही देशांचंं कॉमनसेन्स आणि समजूतदारपणाचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. 

ट्रम्प यांच्या पोस्टनंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनीही युद्धविराम झाल्याचं मान्य केलं. मिसरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई थांबवणार असल्याचं जाहीर केलं. 

( नक्की वाचा : India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video )

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियानो यांनी सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर प्रतिक्रिया दिली.  त्यांनी सांगितलं की,  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनी गेल्या 48 तासांमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स आणि मी पंतप्रधीन नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभार आणि असीम मलीक यांच्यासह भारत आणि पाकिस्तानमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 

Advertisement

पाकिस्तानही तयार

पाकिस्ताननंही अमेरिकेच्या दाव्याला पृष्टी दिली. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर प्रतिक्रिया दिली.

डार यांनी सांगितलं की, पाकिस्तान आणि भारत तातडीनं युद्धविरामासाठी सहमत झाले आहेत. पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या भागातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.