भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात दिवस तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याआधी भारतीय सैन्याने पाकिस्तानचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तान सैन्याने केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यातून पाकिस्तानी सैन्याचं मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानी भू-तळांवर आणि हवाई तळांवर अचूक हल्ले चढवले. स्कार्दू, जेकबाबाद, सरगोदा आणि भुलारी सारख्या हवाई तळांचे यात मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार यंत्रणा देखील नष्ट झाली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानला इतरही मोठे धक्के बसले आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला देखील यामुळे हादरे बसले आहेत.
हजारो कोटींचं नुकसान
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानचा शेअर बाजार सलग तीन दिवस घसरला. यामध्ये 33,952 कोटी रुपयांचं नुकसान झालं. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारला आयएमएफकडून 20,371 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं आहे. मात्र तीन दिवसात पाकिस्तानला झालेल्या तोट्याची तुलना केली तर कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त आहे.
भारतासोबत घेतलेला पंगा पाकिस्तानला किती महागात पडलाय याचा जाणीव त्यांना आता झाली असेल. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या व्हेंटिलेटरवर असलेल्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
लष्कराचे मोठे नुकसान
याशिवाय भारताने पाकिस्तानची दोन F-16 लढाऊ विमाने नष्ट केली, ज्यांची किंमत सुमारे 1000 कोटी रुपये आहे. याशिवाय, भारताने पाकिस्तानची 2 JF-17 लढाऊ विमानेही पाडली, ज्यांची किंमत सुमारे 240 कोटी रुपये आहे. भारताने पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमान देखील नष्ट केले, ज्याची किंमत सुमारे 5,845 कोटी रुपये आहे. असे एकूण पाकिस्तानचे सुमारे 7085 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अमेरिकन विश्लेषक सहर खान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही माहिती शेअर केली आहे. यानुसार, लष्करी कारवायांमध्ये पाकिस्तानला दररोज 212 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्र ऑपरेशन्सवर 2546 कोटी रुपये खर्च झाले. शेअर बाजारात 21 कोटी रुपये नुकसान झाले. पीएसएलच्या निलंबनामुळे 85 कोटी आणि हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे सुमारे 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.