भारताकडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानने एलओसीजवळील भागातील गोळीबार आणि मोर्टास हल्ले वाढवले आहेत. भारतीय सैन्याकडून याला सडेतोड उत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानच्या हल्लात जम्मू-काश्मीर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानने त्यांच्या घरावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात ज्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला त्यांचं नाव राज कुमार थापा असल्याचं सांगितलं जात आहे. थप्पा अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तपदावर काम करीत होते. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याचा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राम कुमार थापा यांच्याशी काही तासांपूर्वीच ऑनलाइन बैठकीत बोलणं झालं होतं.
उमर अब्दुला यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, राजोरीमधून एक वाईट बातमी आहे. जम्मू-काश्मीर प्रसासन सेवेसाठी एक समर्पित अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यात फिरत होते आणि ऑनलाइन बैठकीत सामील झाले होते.
नक्की वाचा - India-Pakistan tension : भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी!
आज त्यांच्या निवासस्थानी पाकिस्तानने गोळीबार केला. त्यांनी राजोरी शहरावर निशाणा साधला होता. ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. हा मोठा धक्का आहे. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.