भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची पुरती तंतरली आहे. पाकिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आता जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून कर्जाची मागणी करीत आहे, अशा आशयाचं ट्विट पाकिस्तान सरकारचे आर्थिक सल्लागार विभागाकडून एक्सवर एक पोस्ट करण्यात आलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या ट्विटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. या ट्विटमुळे पाकिस्तान ट्रोल होत आहे. यानंतर काही वेळाने पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाचं अकाऊंट हॅक झाल्याचं सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं.
पाकिस्तान सरकारच्या आर्थिक सल्लागार विभागाने आधी केलेल्या या पोस्टमध्ये दिल्यानुसार, भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्जाची मागणी करीत आहे. यु्द्धाचं सावट आणि शेअर बाजार कोसळल्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी करत आहे.
सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत...", भारत-पाकिस्तान तणावावर चीनची प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तान तणावावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, "आम्ही काल भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चीनची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या घडामोडींबद्दल चीन चिंतेत आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. ते दोघेही चीनचे शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादा विरोध करतो. आम्ही दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची न करण्याचे आवाहन करतो."