पाकिस्तानकडून वारंवार चिथावणीखोर कृत्य केलं जात आहे. भारताकडून याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानकडून सैन्य ठिकाणं, वैद्यकीय केंद्र आणि शाळा परिसरावर निशाणा साधण्यात आला होता. मात्र भारताने याला प्रत्युत्तर देत हाणून पाडलं. दरम्यान ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, हॉलिडे क्राउड या ट्रॅव्हल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या आणि पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या दोन देशांच्या पर्यटनावर बहिष्कार घातला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या विदर्भ चॅप्टर तर्फेही अशीच एक घोषणा करण्यात आली आहे. तुर्कीये आणि अझरबैजान या राष्ट्रांच्या ट्रॅव्हल बुकिंग रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भातील कोणीही travel booking agent या दोन राष्ट्रांच्या पर्यटनाच्या बुकिंग घेणार नसल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.
देशभरातील अन्य ट्रॅव्हल एजंटनी आणि त्यांच्या संघटनांना अशा प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलावे असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रांनी पाकिस्तानला साथ आणि समर्थन दिल्याबद्दल निर्णय घेतल्याचे टीएएआय तर्फे विदर्भ चॅप्टर अध्यक्ष राजू अकोलकर यांनी NDTV मराठीला माहिती दिली.
नक्की वाचा - India Pakistan Tension : देशप्रथम! मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी आले घरी, अन् लातूरच्या जवानाला बॉर्डरवरुन कॉल
हॉलिडे क्राउड या ट्रॅव्हल्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. तुर्की आणि अझरबैजान येथे जाणाऱ्या नागरिकांचे ट्रॅव्हल्स बुकिंग थांबवण्यात आलं आहे. हे दोन्ही देश पाकिस्तानला पाठिंबा देणारे आहेत. तुर्कीयेने पाकिस्तानला ड्रोनही दिले होते. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यात तुर्कीने दिलेले ड्रोन वापरण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान या हॉलिडे ट्रॅव्हल्स या कंपनीने मोठा निर्णय घेत या दोन्ही देशांच्या पर्यटनावर बहिष्कार घातला आहे. आम्ही शांतता प्रिय आहोत आणि आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आहे. देशापुढे व्यवसाय मोठा नाही असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.