जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी (10 मे, 2025) पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. सात अन्य जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. ही घटना आर एस पुरा सेक्टरमध्ये घडली. शहीद जवान मोहम्मद इम्तियाज बिहारच्या छपरात वास्तव्यास होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज तुकडीचं नेतृत्व करीत होते. धाडसाने ते सर्व सांभाळत असताना पाकिस्तानच्या गोळीबारात ते शहीद झाले. त्यांच्यासोबतच्या जखमी सैनिकांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नारायणपूर गावावर शोककळा...
बीएसएफमध्ये तैनात सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांच्या घरी ही बातमी मिळताच गावावर शोककळा पसरली. आजूबाजूचे लोक इम्तियाज यांच्या घरी जमा झाले. रविवारी सायंकाळपर्यंत पार्थिक गावात येणार असल्याची शक्यता आहे. एकीकडे कुटुंब दु:खात असताना दुसरीकडे आपला लेक देशासाठी शहीद झाला याचा सार्त अभिमान आहे.
तेजस्वी यादव यांनी दु:ख केलं व्यक्त...
तेजस्वी यादव यांनी एक्सवर पोस्ट केलं आहे. त्यांनी लिहिलं, जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी बिहारचे राहणारे बीएसएफचे धाडसी सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद झाले. देशातील प्रत्येक नागरिक त्यांचं धाडस, पराक्रम, बलिदान आणि देशप्रेमाला वंदन करतो.